नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सहकाऱ्याने स्थापन केलेल्या फर्मला एका मद्य व्यापाऱ्याने 1 कोटी रुपये दिल्याचा दावा, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने आपल्या FIR मध्ये केला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मनी ट्रेल स्थापित केला आहे. (Manish Sisodia news in Marathi)
तपास एजन्सीनुसार, गुडगावमधील बडी रिटेलचे संचालक अमित अरोरा, दिनेश अरोरा आणि अर्जुन पांडे हे मनीष सिसोदिया यांचे जवळचे सहकारी आहेत. हे सर्व आरोपी सरकारी सेवकांद्वारे दारू परवानाधारकांकडून गोळा केलेले पैशांची विल्हेवाट लावणे आणि वळवण्यात सहभागी आहेत.
इंडोस्पिरिट्सचे संचालक समीर महेंद्रू याने सिसोदिया यांचे निकटवर्तीय दिनेश अरोरा यांच्या राधा इंडस्ट्रीजला एक कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केल्याचा दावा सीबीआयने केला आहे. या शिवाय सिसोदिया यांचा आणखी एक जवळचा सहकारी अर्जुन पांडे याने विजय नायरच्या वतीने समीर महेंद्रूकडून सुमारे 2 ते 4 कोटी रुपये गोळा केले, असेही सीबीआयने सांगितले.
सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची चौकशी करण्यासाठी एफआयआर नोंदवल्यानंतर आयएएस अधिकारी आणि दिल्लीचे माजी उत्पादन शुल्क आयुक्त अरवा गोपी कृष्णा यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर आणि सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अन्य 19 ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत.
सीबीआयने एफआयआरमध्ये मनीष सिसोदिया, तत्कालीन अबकारी आयुक्त आरव गोपी कृष्णा, तत्कालीन उप उत्पादन शुल्क आयुक्त आनंद कुमार तिवारी, सहाय्यक उत्पादन शुल्क आयुक्त पंकज भटनागर, नऊ व्यावसायिक आणि दोन कंपन्यांची नावे टाकली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.