Centre Suggests Ban on Rottweiler Pitbull Esakal
देश

Centre Suggests Ban on Rottweiler Pitbull: कुत्र्यांच्या 'या' जातींवर बंदी घालण्याचा केंद्राचा सल्ला; माणसांसाठी आहेत धोकादायक

Centre Suggests Ban on Rottweiler Pitbull: सरकारने पिटबुल, रॉटवेलर यांसारख्या अनेक परदेशी जातींच्या कुत्र्यांवर बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय क्रॉस, मिक्स्ड कुत्र्यांवरही बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यांचे वर्णन मानवांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Centre Suggests Ban on Rottweiler Pitbull: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या आणि अशा घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही घटना तर अशा आहेत. ज्यामध्ये घरातील पाळीव प्राण्याने घरातील सदस्यांवर हल्ला चढवला आहे. एका घटनेमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरात एकटे असताना पिटबुल जातीच्या कुत्र्यांने महिलेवर हल्ला केला. समाजात राहणाऱ्या लोकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत.

आता अशा प्रकरच्या घटना रोखण्यासाठी सरकारही सक्रिय झाले आहे. पिटबुल, रॉटवेलर, टेरियर, वुल्फ डॉग, मास्टिफ या परदेशी जातीच्या कुत्र्यांच्या आयात, प्रजनन आणि विक्रीवर बंदी घालावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.

एका समितीच्या शिफारसीच्या आधारावर केंद्र सरकारने या सुचना दिल्या आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, हे विदेशी जातीचे कुत्रे खतरनाक आहेत आणि ते भारतातील परिस्थितीत ते आणखी उग्र होतात. या कुत्र्यांशिवाय इतर मिश्र आणि संकरित कुत्र्यांवरही बंदी घालावी, असे केंद्राचे मत आहे. राज्यांना लिहिलेल्या पत्रात, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना क्रॉस ब्रीडिंग आणि परदेशी जातीच्या कुत्र्यांना परवाने देऊ नयेत असे आवाहन केले आहे. या कुत्र्यांच्या विक्रीवर आणि प्रजननावरही बंदी घालावी असंही म्हटलं आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्राणी कल्याण संस्था आणि तज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. लोकांनी आधीच पाळलेल्या या जातीच्या कुत्र्यांची नसबंदी करावी लागणार असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या जातीचे कुत्रे जन्माला येऊ नयेत.

क्रॉस, मिक्स्ड आणि परदेशी जातीच्या या कुत्र्यांवर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे

- पिटबुल टेरियर

- तोसा इनु

- अमेरिकन स्टेफोर्डशायर टेरियर

- फिला ब्रासीलिरियो

- डोगो अर्जेंटिनो

- अमेरिकन बुलडॉग

- बोएसबोएल

- कनगाल

- सेंट्रल एशियन शेफर्ड

- काकेशियन शेफर्ड

- साउथ रशियन शेफर्ड

- टोनजैक

- सरप्लानिनैक

- जापानी तोसा अॅण्ड अकिता

- मास्टिफ्स

- रॉटलवियर

- टेरियर

- रोडेशियन रिजबैक

- वोल्फ डॉग्स

- कनारियो

- अकबाश

- मॉस्को गार्ड

- केन कार्सो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT