disel petrol esakal
देश

पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार! वाचा कारण

सरकारी मालकीच्या ओएनजीसीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे देशातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात सुमारे दोन टक्क्यांनी घट झाली आहे

सकाळ डिजिटल टीम

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने (Crude oil prices rose) भारतातही त्याचे उत्पादन घटले आहे. आकडेवारीनुसार डिसेंबर २०२१ मध्येही भारतात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट (Decline in production in India) झाली आहे. सरकारी मालकीच्या ओएनजीसीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे देशातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात सुमारे दोन टक्क्यांनी घट झाली आहे.

पेट्रोल (Petrol) आणि डिझेल हे कच्चे तेल शुद्ध करून बनवले जाते. मागणीपेक्षा कमी देशांतर्गत पुरवठ्यामुळे भारताला कच्च्या तेलाची ८५ टक्के गरज आयातीतून भागवावी लागते. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढल्याची सध्याची परिस्थिती आहे. त्याचबरोबर देशांतर्गत उत्पादनातही घट होत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची भीती (Rates will increase) व्यक्त केली जात आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये कच्च्या तेलाचे उत्पादन २५.१ लाख टन होते. जे एका वर्षापूर्वीच्या २५.५ लाख टन आणि २६ लाख टनांच्या उद्दिष्टापेक्षा कमी आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या २४.३ लाख टन उत्पादनापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. भारतातील सर्वांत मोठी तेल उत्पादक ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ONGC) डिसेंबरमध्ये १.६५ दशलक्ष टन क्रूडचे उत्पादन (Decline in production in India) केले. जे तीन टक्क्यांनी घसरले. ऑईल इंडिया लिमिटेडचे ​​उत्पादन ५.४ टक्क्यांनी वाढून २,५४,३६० टन झाले.

दरात कोणताही बदल नाही

सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत (एप्रिल-डिसेंबर) कच्च्या तेलाचे उत्पादन २.६३ टक्क्यांनी घसरून २२.३ दशलक्ष टन झाले आहे. ओएनजीसीचे उत्पादन चार टक्क्यांनी घसरून १४.६ दशलक्ष टन (Decline in production in India) झाले. बुधवारी सलग ७५ व्या दिवशी देशांतर्गत बाजारात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. नवीन दरानुसार, मुंबईतील महानगरांमध्ये पेट्रोल सर्वांत महाग १०९.९८ रुपये आणि दिल्लीत सर्वांत स्वस्त पेट्रोल ९५.४१ रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT