cyclone biparjoy location arabian sea track kerala monsoon india rapidly intensifies into severe cyclonic storm sakal
देश

Biparjoy Cyclone : ‘बिपोरजॉय’ची तीव्रता वाढली; हवामान विभागाने दिली अपडेट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अरबी समुद्रात यावर्षी निर्माण झालेल्या ‘बिपोरजॉय’ या चक्रीवादळाची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसला तरी चक्रीवादळामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला आहे.

केरळमध्ये मॉन्सूनची सुरूवात दमदार न होता ती सौम्य होऊ शकते. मॉन्सूनचा पाऊस लांबला असला तरी त्याची वाटचाल आता वेगाने सुरु असल्याचे हवामान विभागाने सांगितले. हवामान खात्याच्या निवेदनानुसार, पूर्व-मध्य व आग्नेय अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ पाच कि.मी. प्रतितास वेगाने उत्तर दिशेकडे सरकत आहे.

त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून ते गोव्याच्या नैॡत्येला ८६० कि.मी. , मुंबईच्या नैॡत्येला ९७० तर गुजरातेतील पोरबंदरच्या नैॡत्येला १,०५० कि.मी.वर होते. येत्या २४ तासांत हे चक्रीवादळ उत्तरेकडे व त्यानंतरचे तीन दिवस उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाच्या प्रणालीभोवती मोठ्या प्रमाणावर ढग केंद्रित झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : Ramandeep Singh चा अविश्वसनीय झेल; पाकिस्तानी खेळाडू बघतच बसले, फलंदाजाने मारला डोक्यावर हात Video Viral

Delhi Bullet Fire: दिल्लीतील वेलकम मार्केटमध्ये जीन्स विक्रेत्यांमध्ये पैशांवरुन राडा! बंदुकीचे 17 राऊंड फायर, तरुणी जखमी

Nashik Rain: नाशिकच्या चांदवडमध्ये तुफान पाऊस! तामटीचा पाझर तलाव फुटला; नागरिकांचं स्थलांतर

IND vs PAK : दे दना दन...! तिलक वर्माच्या संघातील फलंदाजांनी पाकिस्तानची केली धुलाई

Ambernath Vidhansabha: राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंबरनाथसाठी रुपेश थोरात यांच्या नावावर अखेर शिक्कमोर्तब!

SCROLL FOR NEXT