Cyclone Biparjoy  esakal
देश

Cyclone Biparjoy : गुजरातनंतर राजस्थानमध्ये हाय अलर्ट, अजून कोणकोणत्या राज्यांना धोक्याचा इशारा जाणून घ्या

साधारण 12 किलोमिटर प्रती तास वेगाने राजस्थानकडे गेले आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Cyclone Biparjoy : भारतीय हवामन खात्याने (IMD) चक्रीवादळ बिपरजॉयचे राजस्थानमध्ये प्रवेश झाल्याचे सांगितले आहे. चक्रीवादळ गुजरातच्या 940 गावांवरून साधारण 12 किलोमिटर प्रती तास वेगाने राजस्थानकडे गेले आहे.

गुजरात आणि राजस्थानच्या काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. चक्रिवादळ 15 जूनच्या संध्याकाळी साडेसहा वाजता गुजरातच्या कच्छ सौराष्ट्र किनाऱ्याला धडकले होते. रात्रीच वादळ बाडमेर मार्गे राजस्थान पोहचले. IMD ने 125 ते 140 किलोमिटर प्रती तास च्या वेगाने वादळी हावा चालत आहेत. नंतर याचा वेग 108 किलो मीटर प्रती तासाचा झाला.

चक्रिवादळ बिपरजॉयचा दक्षिण पश्चिम मान्सुनवर असर

चक्रिवादळ बिपरजॉयमुळे दक्षिण पश्चिमी मान्सून कमकूवत झाला. दरम्यान चक्रीवादळाने किनाऱ्यावरच्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस होत आहे. इथे 94000 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 15 जहाज, 7एअरक्राफ्ट आणि NDRF च्या टीम तयार आहेत.

भारतात आज उद्याच्या हवामानाचा अंदाज

  • स्कायमेट व्हेदर रिपोर्टनुसार आज उद्यात गुजरातच्या कच्छक्षेत्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा.

  • सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रात हवेचा वेग 100 किमी प्रती तासाहून जास्त राहील.

  • पूर्वोत्त अरबी समुद्रात मोठ्या लाटा उसळतील, समुद्र धोक्याच्या स्थितीत.

  • आसाम मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि अंदमान, निकोबार द्वीप इथे मध्यम स्वरूपात पाऊस असेल.

  • पूरवोत्तर भारतात बाकी ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसतील.

  • गुजरात क्षेत्र, केरळ, कर्नाटकातला किनारी भाग, कोंकण, गोवा, जम्मू काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेशाचे काही भाग, दक्षिण पश्चिम राजस्थान इथे हलक्या ते मध्यम सरी बरसतील.

  • 16जून पासून दक्षिण पश्चिम आणि पश्चिम राजस्थान मध्ये पावसाची तीव्रता वाढेल.

  • हरियाणा, उत्तर राजस्थान, बिहारचा काही भाग, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, तामीळनाडू, विदर्भ, मराठवाडा इथे 1,2 ठ्काणी बलक्या स्वरुपातील पावसाची शक्यता आहे.

भारतात सर्वाधिक तापमान आणि हिट वेव्हची चेतावणी देण्यात आली आहे. ओडिसा, झारखंड, छत्तीसगडच्या काही भागांमध्ये झळा जाणवतील.

कालचा दिवस

स्काय मेट व्हेदरनुसार मागील 24 तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर मिजोरम, त्रिपुरा, उत्तर पंजाब आणि अंदमान, निकोबार द्वीपांवर काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

उर्वरीत उत्तर भारत, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सौराष्ट्र, कच्छ, दक्षिण गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाचक किनारपट्टी, केरळ इथे हलक्या सरी बरसल्या.

मध्यप्रदेश, विदर्भ, मराठवाडा, हरियाणा, दक्षिण आंतरीक कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमध्ये 1-2 ठिकाणी, छत्तीसगड, तामीळनाडू आणि आंध्रप्रदेश किनारपट्टीवर हलका पाऊस पडला.

आंध्रप्रदेशची किनारपट्टी, बिहार, गंगीय पश्चम बंगालच्या काही भागात आणि तेलंगणा, छत्तीसगड आणि आंतरीक ओडीसामध्ये 1-2 ठिकाणी हिट वेव्ह होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT