चेन्नई - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आज चक्रीवादळात बदलला आहे. निवार नावाचं हे वादळ यावर्षीचं चौथं वादळ आहे. याआधी अम्फान, निसर्ग आणि गती नावाची चक्रीवादळे धडकली होती. सोमालियातून सुरू झालेल्या गती चक्रीवादळाचा धोका टळला आहे. तर सध्या निवार वादळाचा धोका आहे. तामिळनाडु आणि पुद्दुचेरीमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. चेन्नईत पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण वाढू शकते.
चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल तयार आहे. तसंच बचावकार्यासाठी 5 पथके आणि एक डायव्हिंग टीम चेन्नईत तैनात करण्यात आली आहे. तसंच नागपट्टिनम, रामेश्वरम आणि आयएनएस पुरूंदुमध्ये स्टँडबाय म्हणून एक एक पथक दाखल झालं आहे.
तामिळनाडुमध्ये चक्रीवादळाचा धोका असल्यानं बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार तामिळनाडुतील कराइकल आणि मामल्लपुरम दरम्यान असलेल्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकू शकते.
हे वाचा - देशात प्रत्येकापर्यंत लस पोहोचवण्याचं उद्दिष्ट; मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद
पुद्दुचेरीमध्येही मुख्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी मंगळवारी किनारपट्टीच्या भागात दौऱा केला. तसंच सर्व विभागांना हाय अलर्ट देण्यात आला असून वीज आणि पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील याकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. प्रशासन यासाठी तयारी करत असून नुकसान जास्त होऊ नये याची काळजी घेत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.