Cyclone Remal esakal
देश

Cyclone Remal: 'रेमल' घेऊन येत आहे विनाश! जाणून घ्या कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल, मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा...

Cyclone Remal: 26 मे आणि 27 मे रोजी उत्तर ओडिशातील बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Sandip Kapde

Cyclone Remal:

तीव्र चक्रीवादळ 'रेमल' वादळाच्या रूपात बांगलादेश आणि लगतच्या बंगालच्या किनारपट्टीवर आज (रविवार) धडकेल. यामुळे चक्रीवादळामुळे ताशी 102 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, अशी माहिती आयएमडीने दिले आहे. हवामान विभागाने सांगितले की, रेमल चक्रीवादळामुळे 26-27 मे रोजी पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये खूप मुसळधार पाऊस पडू शकतो.

26 मे आणि 27 मे रोजी उत्तर ओडिशातील बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 27 मे रोजी मयूरभंजमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 26 मे रोजी मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये 27 आणि 28 मे रोजी पाऊस अपेक्षित आहे. बिहारमध्येही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. त्रिपुरा सरकारने पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळाचा इशारा दिल्यानंतर सर्व आठ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात संभाव्य जीवित आणि मालमत्तेची हानी कमी करण्यासाठी नऊ आपत्ती निवारण पथके तैनात केली आहेत. या आपत्ती निवारण पथकांना हल्दिया, पारादीप, गोपालपूर आणि फ्रेजरगंजसह वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत देण्यासाठी आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत. दुसरीकडे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या 12 टीम्स पश्चिम बंगालमधील संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आल्या असून पाच तयार ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, चक्रीवादळ रेमलचा संभाव्य परिणाम लक्षात घेता कोलकाता विमानतळ प्राधिकरणाने रविवारी दुपारपासून 21 तासांसाठी फ्लाइट ऑपरेशन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

REMAL चा अर्थ काय आहे, चक्रीवादळ का येतात?

रेमल हा अरबी शब्द आहे, त्याचा अर्थ वाळू. ब्युरो ऑफ मेट्रोलॉजीच्या मते चक्रीवादळासाठी विशिष्ट प्रकारची परिस्थिती जबाबदार असते. जेव्हा समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 26.5 अंशांपेक्षा जास्त होते तेव्हा चक्रीवादळ तयार होते. उष्ण आणि दमट वारे वरच्या दिशेने वाहू लागतात. हे वारे वरच्या दिशेने जाताना त्यांच्या खाली कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. आजूबाजूच्या वाऱ्यांपासून कमी दाबाच्या क्षेत्रात दाब वाढल्याने ते चक्रीवादळाचे रूप धारण करू लागले. चक्रीवादळ काही दिवस किंवा काही आठवडे टिकू शकते.

चक्रीवादळांच्या निर्मितीमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाची उष्णता महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच समुद्राचे तापमान जसजसे वाढत जाईल तसतशी ऊर्जा मिळेल. चक्रीवादळ जिथे पोहोचते तिथे जोरदार वारे आणि पाऊस पडतो.

रेमल चक्रीवादळाचा धोका किती?-

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चक्रीवादळ किती विध्वंस आणेल हे निर्माण झालेल्या दबावावर अवलंबून आहे. भक्कम मोबाइल टॉवर आणि घरेही पाडण्याची ताकद त्यात आहे. रेमलमुळे किती विनाश होऊ शकतो याविषयी हवामान खात्याने बुलेटिन जारी केले आहे. यामुळे घरांचे नुकसान होऊ शकते, असे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. झाडे मुळांसह उपटून टाकता येतात. केळी आणि पपईच्या झाडांची संख्या सर्वाधिक आहे. वीज आणि टेलिफोन लाईन खराब होऊ शकतात. पिकांचे नुकसान होऊ शकते. पाणी साचण्याची शक्यता आहे. जोरदार वारे वाहू शकतात आणि वाहतूक विस्कळीत होऊ शकते.

समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान गेल्या 30 वर्षांतील सर्वाधिक नोंदले गेले आहे. बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. कमी दाब प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर होण्यासाठी, तापमान 26.5 अंश किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.

हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डीएस पै म्हणाले, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होण्याचा अर्थ स्पष्टपणे आहे की तेथे जास्त आर्द्रता आहे. ही आर्द्रता चक्रीवादळाची तीव्रता वाढवण्यासाठी पुरेशी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT