गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यासह पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांना निसर्ग चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. तौक्ते हे यावर्षी आलेलं पहिलं चक्रीवादळ आहे.
Tauktae Cyclone : महाराष्ट्रासह (Maharashtra) चार राज्यांवर ‘तौत्के’ या चक्रीवादळाचे (Tauktae Storm) संकट घोंघावू लागले आहे. सध्या अरबी समुद्रात ‘तौत्के’ चक्रीवादळ घोंघावत असून त्याचा परिणाम किनारपट्टीच्या भागासह पश्चिम महाराष्ट्रावर दिसत आहे. उत्तरपूर्व राजस्थान ते मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे आणि विदर्भावरील चक्राकार वाऱ्याची स्थिती विरून गेल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. येत्या बुधवारपर्यंत शहरासह राज्यातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. पुढील काही दिवस तरी आकाश सामान्यतः ढगाळ राहणार आहे.
चक्रीवादळाचं नाव आलं कुठून?
गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यासह पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांना निसर्ग चक्रीवादळाचा सामना करावा लागला होता. तौक्ते हे यावर्षी आलेलं पहिलं चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाचं नामकरण म्यानमारनं केलं आहे. म्यानमारमध्ये आढळणाऱ्या एका सरड्याचे नाव चक्रीवादळाला देण्यात आले आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण सरडा आवाजासाठी ओळखला जातो.
चक्रीवादळांना नावे कशी दिली जातात?
चक्रीवादळांची नावे वर्ल्ड मेटेरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया एंड पॅसिफिक (WMO/ESCAP), पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (PTC) यांच्याकडून दिली जातात. चक्रीवादळांना नावे देणाऱ्या पॅनेलमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलँड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या देशांचा समावेश होतो. भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना या १३ देशांकडून क्रमाने नाव दिली जाते. भारतीय हवामान विभागाने नुकतीच भविष्यात बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या १६९ चक्रीवादळांच्या नावांची यादी जाहीर केली.
२००४ मध्ये आठ देशांचा समावेश असलेल्या या समूहाने अंतिम ६४ नावे निश्चित केली. प्रत्येक देशाकडून ८ नावे घेण्यात आली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात धडकल्याने अम्फान नावाचं चक्रीवादळ धडकले होते. त्यानंतर अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचे नाव या यादीतील पहिले नाव होते. या चक्रीवादळाचे नाव बांगलादेशने ठेवले होते.
चक्रीवादळांच्या नावासाठी काय आहेत निकष?
चक्रीवादळांची नावे लहान, सोपी आणि सहज समजतील अशी असावीत. तसेच सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील नसावेत. तसेच त्यातून कोणताही प्रक्षोभक अर्थ निघणार नाही, हे आणखी महत्त्वाचे निकष आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.