dalit boy tied up and beaten for plucking pomegranate in Telangana crime News  
देश

Telangana Crime : संतापजनक! डाळिंब तोडल्याचा रागातून दलित मुलाला दोरीने बांधून मारहाण; आरोपी निवृत्त मुख्याध्यापक

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद, ता. २६ (पीटीआय): घराच्या भिंतीवर चढून डाळिंब तोडत असल्याचे पाहून एक निवृत्त मुख्याध्यापक आणि त्याच्या मुलाने चौदा वर्षाच्या एका दलित मुलाला दोरीने बांधून त्याला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी आणि त्याच्या मुलाविरुद्ध कलम ३४२, ३२४ तसेच ॲट्रॅासिटीच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैदराबाद शहरातील बाह्य भागातील शाबद मंडळातर्गंत असलेल्या केसाराम गावात २२ जून रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा अनुसूचित जातीतील असून तो डाळिंब तोडण्यासाठी एका घराच्या भिंतीवर चढला होता. भिंतीवर मुलगा असल्याचे पाहून घर मालकाने आरडाओरडा केला आणि त्याला पकडले. त्याचवेळी त्याने आपल्या मुलाला बोलावले आणि पीडित मुलाचे हातपाय बांधून त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर या मालकाच्या मुलाने बेदम मारहाण केली.

या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोत पीडित मुलगा जमीनीवर पडलेला दिसतो. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने २४ जून रोजी तक्रार दाखल केली आणि यानुसार आरोपी आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पीडित मुलाची आई घरमालकाला भेटण्यासाठी गेली असता आरोपीने शिवीगाळ केल्याचेही पोलिसांच्या तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकारामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सरकारी शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT