2-DG medicine developed by DRDO Photo by ANI
देश

DRDOच्या 2-DG कोरोना प्रतिबंधक औषधाला DGCIची परवानगी

तोंडाद्वारे घेण्यात येणाऱ्या या औषधामुळे कोविडचे रुग्ण लवकर बरे होत असल्याचं क्लिनिकल ट्रायलमधून सिद्ध

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरिटरीजच्या सहकार्याने बनवण्यात आलेल्या 2-DG या कोविड प्रतिबंधक औषधाला केंद्र सरकारच्या ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) या विभागानं मंजुरी दिली आहे. हे कोविड प्रतिबंधक औषध तौडाद्वारे घेता येणारं औषध असून यामुळे कोविडचे रुग्ण लवकर बरे होत असल्याचं क्लिनिकल ट्रायलमध्ये सिद्ध झालं आहे.

डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी लॅबनं बनवलेलं Drug 2-deoxy-D-glucose (2-DG) हे औषध असून याला देशात आपत्कालिन परिस्थितीत वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कोविड नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांमध्ये या आणखी एका प्रयत्नांची भर पडली आहे.

क्लिनिकल ट्रायल्समध्ये हे सिद्ध झालंय की, 2-DG हे औषध जे रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत तसेच जे रुग्ण सिलिंडरमधील ऑक्सिजन अवलंबून आहेत त्यांना हे औषध घेतल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी होऊ शकते. ज्या रुग्णांना 2 DG हे औषध दिलं जातंय त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येण्याचं प्रमाणंही जास्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवळी या महामारीशी लढण्यासाठी तयारी करण्याचे विविध घटकांना आवाहन केले होते तेव्हा डीआरडीओनं एप्रिल २०२०मध्ये 2-DG य औषधावर काम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्सदरम्यान आढळून आलं की, हे औषध SARS-Cov-2 (कोविड-१९) या आजारावर प्रभावीपणे काम करते. दरम्यान, या औषधाच्या फेज-२ मधील क्लिनिकल ट्रायलला मे २०२० मध्ये परवानगी दिली होती. त्यानंतर मे-ऑक्टोबर २०२० मध्ये डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी यांनी मिळून फेज-२ च्या ट्रायलला सुरुवात केली होती. फेज-२ची ट्रायल ६ रुग्णालयांमध्ये घेण्यात आली यामध्ये ११० रुग्णांवर याची चाचणी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT