Chirag Paswan sakal
देश

Chirag Paswan : ‘विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल’

गैरप्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करून याबाबत विद्यार्थी हिताचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल.

पीटीआय

पाटणा - ‘वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेशी (नीट) निगडित सर्व संबंधित संस्थांशी केंद्र सरकार चर्चा करत असून यातील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करून याबाबत विद्यार्थी हिताचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल,’ असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शनिवारी माध्यामांशी बोलताना दिले.

‘नीट’वरून संसदेमध्ये गदारोळ करत कामकाज अडथळा आणणाऱ्या विरोधकांची चुकीची विचारसरणी उघड झाली आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत आहेत, हा विषय न्यायप्रविष्ट देखील आहे, आणि केंद्र या संदर्भातील सर्व संस्थांशी चर्चा करत आहे आणि लवकरच योग्य ती पावले उचलली जातील, असे त्यांनी चिराग म्हणाले.

‘विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू देणे आवश्‍यक आहे. त्यांनी चर्चेमध्ये सहभाग घ्यावा, सरकार चर्चा करायला तयार आहे. परंतु विरोधक संसदेचे कामकाज चालू देत नाहीत असे ते म्हणाले.

दरम्यान, बिहारमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ‘एनडीए’एकत्रपणे लढणार आहे असेही पासवान यांनी स्पष्ट केले.

शाळेच्या प्रमुखाला गुजरातमध्ये अटक

गोधरा - ‘नीट’च्या गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) येथील जय जलाराम शाळेचे प्रमुख दीक्षित पटेल यांना रविवारी अटक केली. जय जलाराम शाळेत ‘नीट’चे केंद्र होते. पटेल यांना अहमदाबादमधील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT