Defence Minister Rajnath Singh  
देश

'सागराच्या तळातूनही शोधून काढू'; INS इंफाळच्या उद्घाटनावेळी राजनाथ सिंहांचा ड्रोन हल्ला करणाऱ्यांना इशारा

INS इंफाळ युद्धनौका मंगळवारी भारतीय नौदलात सहभागी झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबई डॉकयार्डमध्ये इंफाळ युद्धनौकेचे उद्घाटन केले.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- INS इंफाळ युद्धनौका मंगळवारी भारतीय नौदलात सहभागी झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मुंबई डॉकयार्डमध्ये इंफाळ युद्धनौकेचे उद्घाटन केले. ही युद्धनौका पश्चिमी नौदल विभागाचा भाग असेल. चीनची हिंद महासागरात वाढती घुसखोरी आणि अरबी समुद्रातील नुकतीच घडलेली घटना पाहता या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाचे बळ वाढणार आहे.

राजनाथ सिंग यावेळी म्हणाले की, अरबी समुद्रात एमव्ही चेम प्लुटो आणि लाल समूद्रात साई बाबा व्यावसायिक जहाजावर हल्ला करणाऱ्या शत्रूंना समुद्राच्या खोल तळातून देखील आपण शोधू काढू आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करु. गेल्या काही वर्षांत भारतीय नौदलाने सागरी देखरेख वाढवली आहे. तसेच समुद्रातील हल्ल्यांना सरकार गांभीर्याने घेत आहे. ( Defence Minister Rajnath Singh at the commissioning of INS Imphal drone attack)

आयएनएस इंफाळ अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. यात जमिनीवरुन जमिनीवर मार करणारे ८ बराक, १६ ब्रह्मोस अँटीशीप मिसाईल, सर्विलंस रडार, ७६ एमएम रॅपिड माऊंड गन आणि अँटी सबमरीन टॉरपीडो आहेत. याला २० ऑक्टोबर २०२३ रोजी भारतीय नौसेनेला सुपूर्द करण्यात आले होते. याआधी त्याचे समूद्री टेस्टिंग झाली होती. सर्व स्तरावर योग्य कामगिरी केल्यानंतर आयएनएस इंफाळ भारतीय नौसेनेत सामिल करण्यात आलंय.

दरम्यान, अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीपासून २०० नॉटिकल मैल अंतरावर एका व्यावसायिक जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला इराणने केल्याचा दावा अमेरिकेने केला होता. पण, इराणने हा दावा फेटाळला आहे. दुसरीकडे, लाल समुद्रात भारतीय झेंडा असलेल्या साईबाबा या तेल घेऊन येणाऱ्या जहाजावर हुथी बंडखोरांनी ड्रोन हल्ला केला होता. त्यामुळे नौदलात युद्दनौकाच्या समावेशाचे महत्व अधोरेखित होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT