Ajay Kothiyal Arvind Kejriwal esakal
देश

मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणाऱ्या 'आप'च्या नेत्याचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

सकाळ डिजिटल टीम

गंगोत्री विधानसभा मतदारसंघातून कोठियाल यांनी निवडणूक लढवली होती.

डेहराडून : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) ज्येष्ठ नेते कर्नल अजय कोठियाल (Ajay Kothiyal) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. कोठियाल यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना राजीनामा पत्र पाठवलंय. कर्नल कोठियाल हे उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत (Uttarakhand Assembly Election) आपच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते.

कर्नल अजय कोठियाल यांनी अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या राजीनामा पत्रात लिहिलंय, मी 19 एप्रिल 2021 ते आज 18 मे पर्यंत आम आदमी पक्षाचा सदस्य आहे. आज 18 मे 2022 रोजी माजी सैनिक, माजी निमलष्करी, वृद्ध, महिला, युवक आणि विचारवंत यांच्या भावना लक्षात घेऊन मी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पाठवत आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

कर्नल कोठियाल या वर्षीच्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते, त्यांनी उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री विधानसभा मतदारसंघातून (Gangotri Assembly Constituency) निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत कर्नल कोठियाल यांना आपलं डिपॉझिटही वाचवता आलं नाही. त्यांना केवळ 6,161 मतं मिळाली. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झालं तर कोठियाल यांना फक्त 10.33 मतं मिळाली होती. या वर्षी झालेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं अजय कोठियाल यांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केलं होतं. या निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी 'आप'ला एकही जागा जिंकता आली नाहीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT