Delhi Air Pollution sakal
देश

Air Pollution : दिल्लीची हवा पुन्हा गंभीर श्रेणीत; एक्यूआय ४०१ वर

देशाच्या राजधानीतील हवेचा दर्जा पुन्हा खालावला असून तो गंभीर श्रेणीत पोचला आहे.

पीटीआय

नवी दिल्ली - देशाच्या राजधानीतील हवेचा दर्जा पुन्हा खालावला असून तो गंभीर श्रेणीत पोचला आहे. आज सकाळी आठ वाजता दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) ४०१ इतका नोंदविला गेला. तापमानात झालेले घट आणि रात्री संथ गतीने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे प्रदूषकांचा संचय होण्यास मदत झाली.

एक्युआयच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. दिल्लीत बांधकामांवर तसेच प्रदूषण करणाऱ्या ट्रकवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (ता.१८) उठविली होती. त्यानंतर हवेचे प्रदूषण पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. या बंदीमुळे वाऱ्याचा वेग व दिशा या अनुकूल घटकांमुळे वाढणाऱ्या हवेच्या प्रदूषणाला आळा बसला होता. केवळ दिल्लीच नव्हे तर दिल्लीच्या आसपासच्या शहरांतील हवा प्रदूषणही वाढत आहे.

गाझियाबादेत ३८६, गुरूग्राममध्ये ३२१, ग्रेटर नोएडात ३४५ आणि फरिदाबादेत ४१० एक्युआयची नोंद झाली. तो अतिशय खराब ते गंभीर या श्रेणीत होता. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेने विकसित केलेल्या हवा गुणवत्ता यंत्रणेच्या अंदाजानुसार दिल्लीतील हवेचा दर्जा येत्या पाच ते सहा दिवसांत अतिशय खराब ते गंभीर या श्रेणीदरम्यान राहण्याची शक्यता आहे.

दिल्ली सरकार आणि आयआयटी, कानपूरच्या संयुक्त प्रकल्पाच्या डेटानुसार राजधानीत गुरुवारी (ता.२३) हवेच्या प्रदूषणात वाहनांचा वाटा सुमारे ३८ टक्के होता. त्यानंतर, वाहनांसह ऊर्जा प्रकल्प, तेल शुद्धीकरण प्रकल्पांमुळे वायू आणि प्रदूषकांमध्ये होणाऱ्या परस्परक्रियेमुळे वातावरणात सल्फेट आणि नायट्रेटसारखे प्रदूषित घटक तयार होऊन होणाऱ्या प्रदूषणाचा क्रमांक लागतो.

गेल्या काही दिवसांत दिल्लीतील एकूण हवा प्रदूषणात या घटकांचा वाटा २५ ते ३५ टक्के इतका आहे. शेजारील राज्यांतील काडीकचरा जाळण्यासह जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे हवेचे प्रदूषण २१ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT