देश

Delhi Pollution : दिल्ली-NCRमध्ये प्रदूषणाचा स्फोट! मागचे सर्व रेकॉर्ड मोडत एक्यूआय 999 वर

रोहित कणसे

दिवाळीत फटाक्यांमुळे दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढली आहे. दिवाळी संध्याकाळपर्यंत २१८ असलेला एक्यूआय दिवाळीनंतर दुसऱ्या दिवशी ९९९ वर पोहोचला आहे. दिल्लीतील आनंद विहार, जहांगीरपुरी, आरके पुरम, ओखला, श्रीनिवासपुरी, वजीरपूर, बवाना आणि रोहिणी येथेही प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

एकीकडे फटाक्यांमुळे एक्यूआयपातळी वाढला आहे, तर दुसरीकडे व्हिजीबीलीटी देखील घटल्याचे पाहायला मिळाले. इंडिया गेटच्या आजूबाजूची परिस्थिती इतकी बिकट होती की, १०० मीटर अंतरावरही स्पष्ट दिसणे अवघड झाले. दिवाळीपूर्वीच दिल्ली-एनसीआरची एक्यूआय पातळी ९९९ पर्यंत वाढली होती, पण त्यानंतर झालेल्या पावसाने थोडासा दिलासा मिळाला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

दिवाळीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत स्वच्छ हवेचा गेल्या आठ वर्षांतील विक्रम मोडला होता. अनेक वर्षांनंतर दिवाळीत दिल्लीकरांना आकाश निरभ्र पाहायला मिळालं. दिवाळीपूर्वीच प्रदूषणामुळे बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत फटाके आणि फटाक्यांची विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत दिल्ली-एनसीआरच्या जनतेने जोरदार फटाके फोडण्यात आले.

दिल्लीत रेकॉर्डब्रेक प्रदूषण

दिल्ली-एनसीआर मध्ये यावर्षी दिवाळीनंतर झालेल्या प्रदगूषणाने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. यापूर्वी २०१६ मध्ये एक्यूआय ४३१ नोंदवला गेला होता. यानंतर २०२० मध्ये ४४१ तर २०२१ मध्ये ३८२, २०१९ मध्ये ३३७, २०२१ मध्ये ३१९ आणि २०१८ मध्ये २८१ नोंदवला गेला होता.

महत्वाचे म्हणजे ० ते ५० च्या दरम्यान एक्यूआय चांगला मानला जातो, ५१ ते १०० मध्ये समाधानकारक, १०१ ते २०० च्या मध्ये मध्यम, २०१ ते ३०० खराब तर ३०१ ते ४०० च्या मध्ये असलेला एक्यूआय खराब मानला जातो. ४०१ ते ५०० एक्यूआय गंभीर मानला जातो.

दिवाळीनंतर प्रदूषणाची पातळी किती वाढली आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, दिवाळीपूर्वी पीएम २.५ ची पातळी ५६ पीपीएम (पार्ट प्रति मिलियन) च्या मर्यादेत होती. जी दिवाळीच्या दिवशी वाढून २ हजार पीपीएमच्या पुढे गेली होती. सध्या ती एक हजार पीपीएम पेक्षा जास्त आहे. पीएम २.५ बद्दल बोलायचे झाल्यास ते ६० पीपीएम आदर्श मानल जाते. याच्या आत आसलेला पीएम २.५ नागरिकांसाठी योग्य मानला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT