देश

दिल्लीत मुसळधार! विमानतळासहित दिल्ली पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाने आज जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका बसला आहे. दिल्लीच्या विमानतळावरून होणारी तीन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच पाच विमाने अन्यत्र वळविण्यात आले आहे. दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळावर साचलेले पाणी अर्ध्यातासात दूर केल्याचे स्पष्ट केले आहे.

गेले काही दिवस दिल्लीत उकाडा वाढल्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार शनिवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. दिल्ली शहर, राजधानी क्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरात पाण्याची तळी साचली. त्याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल तीनवरील काही भाग पाण्याखाली गेला होता. मुसळधार पावसाने साचलेल्या पाण्याची दखल विमानतळ प्राधिकरणाकडून लगेचच घेण्यात आली. 2003 मध्ये विक्रमी अशा 1050 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र हा विक्रम मोडत आता 1150 मिमी पावसाची नोंद झाल्याने शहरात गेल्या 46 वर्षांत पडलेल्या पावसाचा हा सर्वांत मोठा विक्रम आहे.

विमाने वळविली

दिल्लीत विमानतळावर येणारी चार आणि एक आंतरराष्ट्रीय विमान जयपूर तसेच अहमदाबादकडे वळविण्यात आले. पाणी काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. सकाळी नऊ वाजता विमानतळांवरील कामकाज पूर्ववत झाल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी फोटो आणि एक व्हिडिओ ट्विट केला असून, अर्ध्यातासात पाणी काढण्यात आल्याचे त्यांनी ‘ट्विट’मध्ये म्हटले आहे.

वाहतुकीची कोंडी

दिल्ली विमानतळासह दिल्लीतील अनेक भागांत प्रचंड पाणी साचले, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र होते. दुचाकी, रिक्षा आदी वाहने या पाण्यात बंद पडल्याने त्यांना ढकलत नेण्याची वेळ नागरिकांवर आली. दिल्लीच्या इंडिया गेट, मिंटो रोड, आयटीओ, आर. के. पूरम, मोती बाग, पालम, द्वारका आणि मधुविहार या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. धौला कुआँ ते गुरुग्राम, आझादपूर ते मुबारका चौक यांसह द्वारका ते पालम आदी बहुतांश मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गानी वळविण्यात आली होती.

तापमानात घट

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून उकाडा होता. हवेतील आर्द्रता वाढल्याने दिल्लीकर घामाघूम होत होते. संततधार पावसाने किमान तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या दिल्लीकरांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT