देश

'ममतां'नी घेतली सोनिया गांधींची भेट; 2024 च्या निवडणुकीची तयारी?

विनायक होगाडे

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेतली आहे. आज ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. १० जनपथ येथील या भेटीवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. सोनिया गांधींच्या निवासस्थानी जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली. याआधी मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. बैठकीनंतर सौजन्य भेट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. नरेंद्र मोदींविरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी मोट बांधण्यासाठी ममतांचा हा दौरा असून तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही ‘एबार शपथ, चलो दिल्ली’ याबाबतची घोषणा देण्यात आली आहे.

सोनिया गांधी यांना विरोधकांची एकजूट हवीय. काँग्रेसच्या प्रादेशिक पक्षांवर विश्वास आहे आणि प्रादेशिक पक्ष देखील काँग्रेसवर विश्वास ठेवतात, असं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी या भेटीपूर्वीच केलं होतं.

या भेटीसंदर्भात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच कोरोनाच्या लढ्याबाबत देखील चर्चा झाली. विरोधकांच्या एकजुटीबाबत देखील बोलणं झालं. ही खूपच चांगली भेट होती. या भेटीचे काही सकारात्मक परिणाम नक्कीच भविष्यात दिसून येतील.

भाजपचा पराभव करण्यासाठी सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. मी एकटी म्हणजे काहीच नाही. सगळ्यांनीच एकत्र येत काम करण्याची गरज आहे. मी काही नेता नाही, मी कार्यकर्ती आहे. मी रस्त्यावर काम करणारी कार्यकर्ती आहे.

त्यांनी गेल्या मंगळवारी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासहित काँग्रेसचे नेते आनंद शर्मा आणि कमलनाथ यांची भेट घेतली होती. त्यांनतर त्यांनी काल सायंकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीपूर्वीच आज ममता बॅनर्जी यांनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली आहेत. ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींविरोधात आपला एल्गार व्यक्त करताना म्हटलंय की, संपूर्ण देशात 'खेला' होईल. ही एक सततची प्रक्रिया आहे. जेंव्हा २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुका असतील, तेंव्हा ती निवडणूक 'मोदी विरुद्ध देश' अशीच असेल.

२०२४ साली तुम्ही विरोधकांच्या एकजुटीचा चेहरा असाल का, या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलंय की, मी काही राजकीय ज्योतिषी नाहीये, हे सगळं त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. इतर कोणी नेतृत्व केल्यास मला काही हरकत नाही. जेव्हा या विषयावर चर्चा होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ शकतो. मी निर्णय थोपवू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT