Aakar Patel SAKAL
देश

"आकार पटेल यांच्या विरोधातील लुक-आउट नोटीस त्वरित मागे घ्या"

सीबीआयने गेल्या डिसेंबरमध्ये अ‍ॅम्नेस्टी इंडिया आणि त्याचे माजी प्रमुख आकार पटेल यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली न्यायालयाने सीबीआयला अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थेचे माजी प्रमुख आकार पटेल यांच्या विरोधात जारी केलेले लुक-आउट नोटीस त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिले.

सीबीआयने गेल्या डिसेंबरमध्ये अ‍ॅम्नेस्टी इंडिया आणि त्याचे माजी प्रमुख आकार पटेल यांच्याविरुद्ध विदेशी योगदान (नियमन) कायदा, 2010 चे उल्लंघन केल्याबद्दल आरोपपत्र दाखल केले होते.

आकार पटेल यांनी अलीकडेच सीबीआयने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या लुकआउट परिपत्रकाच्या (एलओसी) विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टाने सीबीआयला लुक आऊट नोटीस मागे घेण्यास सांगितले

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थेचे माजी प्रमुख आकार पटेल यांना बंगळुरू विमानतळावरून अमेरिकेस निघालेले असताना अधिकाऱ्यांनी मनाई केली होती. त्याविरुद्ध त्यांनी दिल्ली न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) नोटीस बजावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT