sakal
देश

Delhi Crime: बनावट डॉक्टर अन् 9 मृत्यू! दिल्लीतील उच्चभ्रू भागातील रॅकेट उद्ध्वस्त

रुग्णांचा सर्वाधिक विश्वास असणाऱ्या डॉक्टरी पेशाला यामुळं कलंक लागल्याची चर्चा आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : डॉक्टरी पेशामध्ये नफेखोरीचा प्रकार फोफावत चालल्यानं त्यामध्ये रुग्ण भरडले जात आहेत, हा प्रकार तर आत्तापर्यंत गरीब रुग्णांच्या जीवावरही बेतत होता. पण आता याच नफेखोरीच्या वृत्तीमुळं श्रीमंतांमध्येही रुग्णांच्या जीवाशी खेळ केले जात आहेत.

दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका प्रकारानं खळबळ उडाली आहे. या ठिकाणी बनावट डॉक्टरांकडून रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जात होत्या, त्यामुळं तब्बल ९ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अनेक डॉक्टरांना अटक केली आहे. (Delhi Crime Fake doctor and 9 deaths rackets bursted at Delhi elite area greater kailash)

दिल्लीतील उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जाणारा ग्रेटर कैलाश भागात हा भयानक प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका रुग्णालयात सर्जरीनंतर ४४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना अटक केली. यामध्ये दोन डॉक्टर असे आहेत जे डिग्री मिळवलेली नसताना सर्जरी करत होते. अटक करण्यात आलेले लोक ग्रेटर कैलाश पार्ट १ इथं मेडिकल सेंटर चालवत होते. यात अटक झाल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. (Latest Marathi News)

आत्तापर्यंत ९ जणांचा मृत्यू

चौकशीत हे देखील समोर आलं आहे की, अग्रवाल मेडिकल सेंटरचे संचालक डॉ. नीरज अग्रवाल, त्यांची पत्नी पूजा अग्रवाल आणि मेडिकल सेंटर विरोधात दिल्ली मेडिकल काऊन्सिलमध्ये नऊ तक्रारी केल्या आहेत. त्यांच्यावर उपचारांमध्ये गलथानपणा केल्यानं आत्तापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. (Marathi Tajya Batmya)

प्रसिद्ध सर्जनच्या नावावर सर्जरी

१० ऑक्टोबरला संगम विहार निवास इथले रहिवासी असलेल्या असगर अली यांच्या पत्नीनं या रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी सांगितलं की, डॉ. नीरज अग्रवाल यांनी या आपल्याला सांगितलं होतं की तुमच्या पतीची सर्जरी प्रसिद्ध सर्जन डॉ. जसप्रीत सिंह करतील. यानंतर डॉ. महेंद्र सिंह नामक एका डॉक्टरनं ही सर्जरी केली.

चौकशीत हे स्पष्ट झालं की, सर्जरीच्यावेळी डॉ. जसप्रीत सिंह हे ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित नव्हते. त्याशिवाय त्यांनी आपल्या नावानं असगर अली यांची सर्जरी केल्याची बनावट कागदपत्रेही बनवली होती.

प्रतिबंधित औषधं अन् इंजेक्शन्स जप्त

डॉ. नीरज अग्रवाल यांच्या घराच्या तपासणीत पोलिसांना डॉक्टरांच्या हस्ताक्षरातील ४१४ प्रिस्क्रिप्शन, अनेक प्रतिबंधित औषधं आणि इंजेक्शन्स, सर्जिकल ब्लेड्स, ४७ चेकबूक, ५४ एटीएम कार्ड, पोस्ट ऑफिसचे अनेक पासबूक आणि सहा पीओएस टर्मिनल क्रेडिट कार्ड मशीन हे जप्त करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT