दिल्ली : एका मोबाईल फोन कंपनीने खराब मोबाईल हँडसेट बदलून द्यायला नकार दिल्यामुळे एका व्यक्तीने स्वत:लाच जाळून घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना काल शुक्रवारी दिल्लीमध्ये घडली आहे. या व्यक्तीचे नाव भीमसिंह असे आहे. सध्या त्यांची अवस्था स्थिर आहे, असं कुटुंबियांनी सांगितलं आहे. याबाबतचा अधिक तपास दिल्लीमधील दक्षिण रोहीनी पोलिस स्टेशनमध्ये होत आहे. भीमसिंह हे प्रल्हादपूर गावाचे रहिवासी आहेत सध्या त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा - नव्या संसदेचे भारतीय पद्धतीचे सुशोभिकरण; अशी असणार आहे आपली नवी संसद
आपल्या भाचीला या चाळीस वर्षीय व्यक्तीने नवा मोबाईल घेऊन दिला होता. तो 16 हजार रुपयांचा होता. मात्र, तो खराब निघाल्यामुळे तो बदलून द्यावा, यासाठी संबंधित व्यक्तीने मागणी केली होती. मात्र, दुकानदाराने यास नकार दिल्यामुळे भीमसिंह यांनी स्वत:लाच जाळून घेतले. इतक्या महागाचा मोबाईल खराब होत असेल तर संबंधित कंपनीने तो बदलून द्यायला हवा अशी भीमसिंह यांची मागणी आहे.
भीमसिंह यांनी पोलिसांना सांगितलं की जवळपास एका महिन्यापूर्वी त्यांनी प्रल्हादपूरमधील आपल्या घराजवळील एका दुकानातून मोबाईल खरेदी केला होता. त्यांनी आपल्या भाचीला हा मोबाईल भेट दिला होता. जेणेकरुन तिला आपल्या शाळेतील ऑनलाईन क्लासेसला उपस्थित राहता येईल. काही दिवसांतच या फोनने काम करणं बंद केलं आणि तो फुटला. त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी मोबाईल कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला फोन बदलून देण्याची मागणी केली. मात्र, कंपनीने आपल्याला धोरणांचा हवाला देत फोन बदलून देण्यास नकार दिला. त्यांनी पुन्हा मेल पाठवला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.
हेही वाचा - देशात शुक्रवारी 44,879 नवे रुग्ण; 24 तासांत 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू
काल शुक्रवारी दुपारी साधारण 12 वाजता रोहीणी भागातील सर्व्हीस सेंटरला गेले. तिथे त्या सेंटरमधील स्टाफला त्यांनी विनंती केली. मात्र, त्यांचं ऐकण्यात आलं नाही. म्हणून त्यांनी स्वत:वर पेट्रोल ओतून आग लावून घेतली. जवळील लोक लगेचच त्यांना वाचवण्यासाठी धावले. आणि त्यांना दवाखान्यात नेलं गेलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.