Delhi Murder Mysteries: दिल्लीमध्ये झालेला एक खून ज्याच्या तपासासाठी पोलिसांची कित्येक वर्षे खर्ची पडली. पण ती मर्डर मिस्ट्री आजही एक मिस्ट्री बनून राहिली आहे. १९९४ मध्ये आरोपींनी दिल्लीतल्या वसंत कुंज येथे एका संपूर्ण कुटुंबाला निर्घृणपणे संपवलं होतं. खूनी एवढे चालाख होते की गुन्हा करताना त्यांनी एकही पुरावा मागे सोडला नव्हता. परंतु मृत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या एका पर्समुळे सगळी पोलखोल झाली.
१९९४ मध्ये दिल्लीतल्या सरनपाल कोहली मर्डर केसबद्दल आजही लोक चर्चा करतात. देशातल्या आजवरच्या चर्चित केसमध्ये याचाही समावेश आहे. वसंत कुंजमध्ये रात्रीच्या वेळी आरोपींनी संपूर्ण कुटुंबाचा खात्मा केला होता. या मर्डर मिस्ट्रीच्या तपासात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे आणि नुकतेच निवृत्त दिलेले सुपर कॉप ललित मोहन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
ललित मोहन नेगी यांनी सांगितलं की, २२ जानेवारी १९९४ रोजी सकाळी पाच वाजता वसंत विहार पोलिसांना एक माहिती मिळाली. वसंत कुंज के डी-३/३१२२ या क्रमांकाच्या घरात एका कुटुंबात खून झालाय. मी माझ्या टीमसह घटनास्थळी पोहोचलो. घरामध्ये सरनपाल कोहली, त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पडले होते. एक मुलगा चार वर्षांचा होता तर दुसरा तीन वर्षांचा.
ललित मोहन पुढे सांगतात, आम्ही केसचा तपास सुरु केला. आमच्यापुढे चॅलेंज होतं की खुनी कोण आहे आणि त्याला कसं शोधायचं? सरनपाल कोहली शेअरमध्ये काम करत होते. त्यामुळे सगळ्यात आधी त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांची चौकशी करण्यात आली. हा खून त्यानेच केला असावा जो घरामध्ये सातत्याने येत-जात होता, असा आम्हाला संशय होता.
चौकशीमध्ये दोन कर्मचारी राम पाल सिंह चौहान आणि परमिंदर सिंह यांच्याशी सरनपाल यांचे चांगले संबंध असल्याचं समजलं. त्यामुळे पोलिसांनी त्यांना डिटेन केलं. चौकशीमध्ये दोन्ही व्यक्ती आपला जबाब सातत्याने बदलत होते. नंतर एक माहिती पुढे आली की, शेअर मार्केटमध्ये काम करणारे सरनपाल यांच्याकडे खूप पैसा होता, असा संशय या दोघांना होता.
नेगी पुढे सांगतात, सरनपाल यांच्या खिशामध्ये कुणी पर्स टाकलं, याचा तपास आम्ही सुरु केला. त्याचा उद्देश काय असेल, हे तपासण्यासाठी आम्ही पर्स कुठे बनलं त्या कंपनीचा शोध घेतला. गाझियाबाद येथील कंपनीमध्ये पर्स तयार झालं होतं. त्याच कंपनीमध्ये आरोपी रामपालचे वडील काम करत होते. त्याच्या वडिलांनी ते पर्स कोठारात जमा करण्याऐवजी स्वतःकडेच ठेवलं होतं. ते पर्स त्यांचा मुलगा वापरत होता.
याशिवाय दोन्ही आरोपींचे फिंगरप्रिंट घटनास्थळावरच्या ठशांसोबत जुळले होते. या केसमध्ये कनव्हिक्शन होऊ शकलं नाही. कारण कोर्टाने कुठलाही थेट पुरावा नसल्याचं म्हटलं होते. त्यामुळे कोर्टाने मुक्तता केली. त्यानंतर या केसची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी झाली होती.
दोन वर्षांहून अधिक काळ चालेलल्या या खटल्यामध्ये ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले होते. आरोपपत्रामध्ये विरोधाभास असल्याचा मुद्दा उपस्थित करुन आरोपींच्या पक्षाने बचाव केला. त्यानंतर सरनपाल सिंह कोहलीचे वडील हर चरणसिंह कोहली विरुद्ध दिल्ली पोलिस, असं प्रकरण पुढे बरीच वर्षे सुरु राहिलं. मात्र या केसचं गुढ आजही कायम आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.