Delhi Farmers Protest Esakal
देश

Farmers Protest: केंद्रासोबतची बोलणी फिस्कटली, शेतकरी आक्रमक; जेसीबी-पोकलेन घेऊन आज दिल्लीकडे होणार रवाना

Delhi Farmers Protest: केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Farmers Protest: केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या लवकर मान्य करा अन्यथा दिल्लीत येऊन चक्काजाम करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. तर आम्ही रिकाम्या हाताने आहोत आणि रिकाम्या हाताने परिस्थितीला सामोरे जाऊ, असे शेतकरी नेते सरवनसिंह पंढेर यांनी म्हटले आहे. (Delhi Farmers Protest news farmers arrived with jcb and poklane machines in shambhu border)

आंदोलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हा प्रश्न सोडवावा. सरकारने आम्हाला शांततेने दिल्लीला जाण्याची परवानगी द्यावी. आमच्या शेतकरी आणि मजुरांवर अत्याचार होता कामा नये. नरेंद्र मोदींना आम्ही मतदान करून पंतप्रधान केले आहे. केंद्राने आमचे म्हणणे ऐकून घेतल्यास प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत आतापर्यंत चार बैठका झाल्या. या बैठकांमध्ये केंद्राने शेतकऱ्यांसमोर काही प्रस्ताव ठेवले. मात्र, हे प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी अमान्य केले. सरकारसोबत आता चर्चा करण्यात काही तथ्थ नाही, असं म्हणत शेतकऱ्यांनी आजपासून (बुधवार) दिल्लीच्या दिशेने कूच करण्याची तयारी केली आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. ट्रॅक्टर थांबवण्यासाठी रस्त्यावर खिळे, काटेरी तारांचे कुंपण, सिमेंटचे कठडे टाकले आहेत. मात्र, हे कठडे तोडण्यासाठी शेतकऱ्यांनी शेकडो जेसीबी आणि पोकलेन मशीन सोबत ठेवल्या आहेत.

हजारो संख्येने शेतकरी हरियाणातील शंभू सीमेवर पोहचले असून पोलिसांनी टाकलेले बॅरिकेड्स तोडून मातीच्या पोत्या टाकून ट्रॅक्टर बाहेर काढण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय टिप्पर, हायड्रा आणि इतर वाहने शेतकऱ्यांनी तयार ठेवली आहेत. त्यामुळे पोलिसांसह केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणाच्या डीजीपीने पंजाबच्या डीजीपीला पत्र लिहले आहे. दिल्लीच्या दिशेने येणारे जेसीबी, पोकलेन, टिप्पर, हायड्रा आणि इतर जड दिसतील तिथे जप्त करा, असं डीजीपीने आपल्या पत्रात म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

पंजाब-हरियाणामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत ॲडव्हायझरी जारी

पंजाबमध्ये, डीजीपी पंजाबने खनौरी आणि शंभू सीमेवर पंजाब-हरियाणा सीमेकडे जेसीबी, पोकलेन, टिपर, हायड्रा आणि इतर जड वाहने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत हरियाणा पोलिसांनी हरियाणा-पंजाबच्या सीमा सील केल्या आहेत. लोकांनी पंजाबला जाण्यासाठी ट्रेनचा वापर करावा, असे पोलिसांनी म्हटले आहे.

हरियाणात इंटरनेट बंदी

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदीचा निर्णय 21 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंजाबमधील 7 जिल्ह्यांतील काही भागात केंद्र सरकारने 24 फेब्रुवारीपर्यंत इंटरनेट बंद केले आहे. हे तेच भाग आहेत जिथे शेतकरी दिल्लीला जाण्यासाठी जमले होते.

गाझीपूर सीमा सील, दिल्लीत कलम 144 लागू

शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत दिल्ली पोलीसही सतर्क आहेत. टिकरी सीमा आणि उत्तर प्रदेशला लागून असलेली गाझीपूर सीमा सील करण्यात आली आहे. संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. गर्दी जमवण्यास आणि ट्रॅक्टरच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT