न्यायालयाकडून आरोपींना त्यांच्या गुन्ह्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा सुनावल्या जातात.मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणातील आरोपींना दिलेली शिक्षा खूपच वेगळ्या पद्धतीची आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 2020 मधील एका प्रकरणातील एफआयआर रद्द करताना, तीन आरोपींना चक्क दिल्ली वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 'दिल्ली दर्शन'साठी बस प्रवासाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
हा प्रकरणात भारतीय दंड संहिता, कलम 354 (स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला), 354B (स्त्रीचे कपडे उतरवण्याच्या उद्देशाने मारहाण किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), 341, 506 तसेच 509 आणि 34 या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाती एफआयआर रद्द करताना कोर्टाने हे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणात तक्रारदाराने न्यायालयाला सांगितले की. ऑगस्टमध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये आपापसात कोर्टाबाहेर समझोता करार झाला आणि तिने स्वेच्छेने आरोपीसोबतचे सर्व वाद मिटवले आहेत. तसेच नमूद केले की त्यांना आरोपींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची इच्छा नाही आणि एफआयआर रद्द करण्यास तिचा आक्षेप नाही.
यानंतर न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी आरोपींना किमान 4 तासांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना दिल्ली दर्शनासाठी घेऊन जाण्यासाठी एकत्रितपणे भाड्याने बसची व्यवस्था करण्यास सांगितले.
तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी दिल्ली दर्शन प्रवासाच्या वेळी अन्न आणि पाण्याची सर्व आवश्यक व्यवस्था करावी. इतकेच नाही तर या ज्येष्ठ नागरीकांसाठी सोबत वैद्यकीय परिचारक देखील असावा असे निर्देष देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.