न्यायालयाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि दिल्ली सरकारला देखील नोटीस बजावली आहे.
नवी दिल्ली : जीवनावश्यक औषधे (Medicines) आणि कोरोनावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची साठेबाजी आणि काळाबाजार (Black Market) तातडीने रोखण्यात यावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) दिल्ली आणि केंद्र सरकारला दिले आहेत. काही दिवसांपूर्वी राजधानीमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा (Oxygen Concentrator) मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचे उघड झाले होते. न्या. विपिन संघी आणि न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर सोमवारी (ता.१०) याबाबतच्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. (Delhi High Court directed that immediate steps be taken to curb black market in drugs and other items)
कोरोनावरील उपचारासाठी वापरली जाणारी औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. हा काळाबाजार रोखायचा असेल तर तातडीने पावले उचला त्यासाठी आमच्या आदेशांची वाट पाहू नका, असेही न्यायालयाने ताज्या आदेशांत म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयास नोटीस
याप्रकरणी न्यायालयाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि दिल्ली सरकारला देखील नोटीस बजावली आहे. साठेबाजीची ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. दिल्लीतील रहिवासी मनिषा चौहान यांनी ही याचिका सादर केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.