नवी दिल्ली : कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट प्रकरणी फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली हायकोर्टाची बिनशर्त माफी मागितली आहे. यानंतर पुन्हा अशी चूक होता कामा नये अशी समज देत कोर्टानं त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त केलं आहे. सन २०१८ मध्ये अग्निहोत्री यांनी न्या. एस. मुरलीधर यांच्यावर भीमा कोरेगाव प्रकरणात दिलेल्या एका निर्णयावर टीका केली होती. (Delhi High Court discharges Vivek Agnihotri in contempt case after Unconditional apology)
विवेक अग्निहोत्रींनी काय ट्विट केलं होतं?
सन २०१८ मध्ये विवेक अग्निहोत्री यांनी एक एक ट्विट रिट्विट केलं होतं, ज्यामध्ये हायकोर्टाचे माजी न्या. एस. मुलरीधर यांच्याविरोधात भाष्य केलं होतं. जे सध्या ओरिसा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश आहेत. न्या. मुलरीधर यांनी भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलाखा यांच्या नजरकैदेच्या आणि ट्रान्सिट रिमांड रद्द करण्याच्या आदेशासंदर्भात ही पोस्ट होती. यामुळं कोर्टाचा अवमान झाल्याचा गुन्हा अग्नहोत्री यांच्यावर दाखल करण्यात आला होता.
अग्निहोत्री यांनी कोर्टात सांगितलं की, "माझ्या न्यायव्यवस्थेबद्दल उच्च आदर आहे. माझ्या कोर्टाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता" त्यांनी यापूर्वीच गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कोर्टाकडं बिनशर्त माफी देखील मागितली होती. यानंतर हायकोर्टानं अग्निहोत्री यांना समज देताना न्या. मृदूल यांनी म्हटलं की, "भविष्यात अशा प्रकारचे टिप्पण्या येता कामा नये याची काळजी घेतली जावी"
ट्विटर हे दुःखाच मोठं साधन बनलं आहे
या प्रकरणी सुनावणी दरम्यान हायकोर्टानं ट्विटरवर जे काही लिहिलं आणि शेअर केलं जात त्यावरही भाष्य केलं आहे. ट्विटर हे दुःखाच मोठं साधन बनलं आहे, अशी टिप्पणी हायकोर्टानं या प्रकरणी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.