delhi High court grant divorce for wife repeatedly leaving in laws house is cruelty marathi news  
देश

पत्नीने वारंवार सासरचे घर सोडून जाणे ही पतीसोबत क्रूरता, हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

Delhi High Court : दिल्ली हायकोर्टाने पती-पत्नी यांच्या भांडणासंबंधी एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.

रोहित कणसे

Delhi High Court Latest News : दिल्ली हायकोर्टाने पती-पत्नी यांच्या भांडणासंबंधी एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. यामध्ये पतीची काहीही चूक नसताना पत्नी सतत आपले सासर सोडून जात असेल तर हे मानसिकरित्या क्रूरता करणारे वर्तन असल्याचे म्हटले आहे.

जस्टिस सुरेश कुमार कैत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सांगितले की वैवाहिक संबध हे परस्पर समर्थन, समर्पण आणि निष्ठा असलेल्या वातावरणात वृद्धिंगत होते. यासोबतच दूरावा आणि सोडून जाणे यामुळे वैवाहिक संबंध तुटतात. कोर्टाने ही टिप्पणी एकमेकांपासून दूर राहत आसलेल्या जोडप्याला पत्नीकडून क्रूरता आणि सोडून दिल्याच्या कारणावरून घटस्फोट मंजूर करताना केली.

नेमकं प्रकरण काय आहे?

या दाम्पत्याचे लग्न १९९२ मध्ये झाले होते आणि फॅमिली कोर्टाने पतीला घटस्फोट देण्यास नकार दिला होता. महिलेच्या पतीने घटस्फोटाची मागणी करताना आरोप केला होता की त्याची रत्नी खूप रागीट असून ती कमीत कमी सात वेळा त्याला सोडून गेली आहे. घटस्फोट देण्यास फॅमिली कोर्टाने नकार दिल्यावर त्याविरोधात अपील स्वीकारत पीठाने सांगितेल की सात वेळा महिला आपल्या पतीपासून वेगळी झाली आणि प्रत्येक वेळी हा कालावधी १० महिने इतका होता.

हायकोर्टाने काय म्हटलं?

हायकोर्टाने सांगितलं की, दीर्घकाळ वेगवेगळे राहणे वैवाहिक संबंधांचे कधीही भरून न येणारे नुकसान होते, जे मानसिक कौर्य आहे आणि वैवाहिक संबंधांपासून वंचित ठेवणे अत्यंत क्रूरतेचे कृत्य आहे.

न्यायालयाने म्हटले की, हे एक स्पष्ट प्रकरण आहे जेथे प्रतिवादी (पत्नी) वेळोवेळी अपीलकर्त्याने कोणतीही चूक न करता सासरचे घर सोडते. प्रतिवादीने अशा प्रकारे वेळोवेळी असे निघून जाणे मानसिक क्रूरतेचे कृत्य आहे. खंडपीठाने म्हटले की, हे मानसिक त्रासाचे प्रकरण आहे. ज्यामुळे अपीलकर्ता घटस्फोट घेण्यास पात्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT