Sharjeel Imam Bail
Sharjeel Imam Bail Esakal
देश

Sharjeel Imam Bail: देशद्रोह प्रकरणात जामीन मिळूनही का होणार नाही शरजील इमामची सुटका; वाचा काय आहे प्रकार

आशुतोष मसगौंडे

दिल्ली उच्च न्यायालयाने शरजील इमामला 2020 च्या दंगली प्रकरणात जामीन मंजूर केला आहे ज्यामध्ये देशद्रोहाच्या आरोपांचा समावेश आहे. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि मनोज जैन यांच्या खंडपीठाने इमामला वैधानिक जामीन मंजूर केला.

7 वर्षांच्या कमाल शिक्षेपैकी निम्मी शिक्षा भोगली असल्याच्या आधारे इमामने जामीन मागितला होता. हे प्रकरण त्याने एएमयू आणि जामिया परिसरात दिलेल्या कथित भडकाऊ भाषणांशी संबंधित आहे.

दिल्लीच्या जामिया परिसरात आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात भडकाऊ भाषण केल्याबद्दल त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली आणि UAPA प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आले होते.

जामीन मिळूनही, इमाम दिल्ली दंगलीच्या कट प्रकरणात इतर आरोपांसाठी तुरुंगातच राहणार आहे.

देशद्रोहाच्या खटल्यात जामीन नाकारणाऱ्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरोधात इमामने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात निषेध करताना AMU आणि जामिया परिसरात इमामने केलेल्या भाषणांशी हे प्रकरण संबंधित आहे.

या प्रकरणी त्याला 28 जानेवारी 2020 रोजी अटक करण्यात आली होती.

इमामचा युक्तिवाद होता की, त्याच्याविरोधात असलेल्या गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त असलेल्या सात वर्षांच्या शिक्षेपैकी त्याने चार वर्षे तुरुंगात घालवली आहेत आणि त्यामुळे तो वैधानिक जामिनासाठी पात्र आहे. देशद्रोहाच्या गुन्ह्याला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि यूएपीएच्या तरतुदींमध्ये त्याच्या विरोधात सात वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होत नाही.

डिसेंबर 2019 मध्ये जामिया नगर भागात CAA विरोधात निदर्शने सुरू होती. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्यानंतर हिंसाचार झाला. 13 डिसेंबर 2019 रोजी जामिया मिलिया इस्लामिया येथे भडकाऊ भाषण देऊन दंगली भडकवल्याचा आरोप शरजील इमामवर आहे.

कोण आहे शरजील इमाम?

शरजीलचा जन्म बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यातील काको येथे एका प्रभावशाली मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील अकबर इमाम जनता दल युनायटेडचे ​​नेते आहेत. शरजीलचे सुरुवातीचे शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल, पाटणा येथून झाले आणि तेथेच त्याने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इयत्ता 10वीमध्ये चांगले गुण मिळाल्यानंतर दिल्ली पब्लिक स्कूल वसंत कुंजमध्ये 11वी आणि 12वीसाठी प्रवेश घेतला. शरजील इमाम याने आयआयटी बॉम्बेमधून बीटेक आणि एमटेक केले आहे, तर 2013 मध्ये त्यांनी जेएनयूमधून आधुनिक इतिहासात पीजी पदवी पूर्ण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai, Pune School Closed: मुंबई, पुण्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Jasprit Bumrah Video: फुलांची उधळण अन् आईनं आनंदानं धरलेला ठेका, विश्वविजेत्या बुमराहचं घरी जल्लोषात स्वागत

Suyash Tilak :  ‘मुलांच्या हातात मोबाईल देताय तर, किमान इतकं करा’ सुयश टिळकचा पालकांना सल्ला

Lice Outbreaks Selfies: सेल्फीमुळं डोक्यात उवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय; अभ्यासातील धक्कादायक निष्कर्ष

Maharashtra News Updates : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT