Delhi Jama Masjid Controversy  
देश

Delhi Jama Masjid : मुलींच्या प्रवेशावरून इमामांचे घूमजाव

मशीद व्यवस्थापन समिती नवी नोटीस काढणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : एकट्या मुलीला किंवा मुलींच्या समूहाला प्रवेश करण्यास मनाई करणारा फलक राजधानी दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदीच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के सक्सेना यांनी विनंती केल्यानंतर मशिदीच्या शाही इमामांनी हा फलक काढून टाकण्याची तयारी दर्शविली. राजभवनाकडूनच ही माहिती देण्यात आली.

याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने मशिदीच्या इमामांना नोटीस बजावली. हा वाद वाढल्यावर जामा मशीद व्यवस्थापनाने सायंकाळी यात काहीतरी चूक झाली असे सांगून ही नोटीस काढून घेतली व नव्याने नोटीस लावली जाईल असा खुलासा केला. मशिदीच्या परिसरात मुली एकट्या येत नाहीत तर त्यांच्यासोबत तरुणही असतात. ते येथे नाचतात , सेल्फी काढतात. असे प्रकार रोखण्यासाठीच ही नोटीस लावली आहे असा खुलासा जामा मशिदीच्यावतीने करण्यात आला होता. मात्र त्यानंतर मशिदीने कोलांटउडी मारत, त्या नोटिशीतील शब्द चुकीचे होते असा खुलासा केला.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी यावर संताप व्यक्त करत मशिदीच्या मुख्य इमामांना नोटीस बजावण्यास सांगितले आहे त्या म्हणाल्या की, '' आपण भारतात आहोत, इराणमध्ये नाही. जामा मशिदीत महिलांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. पूजेचा-प्रार्थनेचा जितका अधिकार पुरुषाला आहे तितकाच स्त्रीलाही आहे. ’’

... तर रोखणार नाही

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी नमाज पठणासाठी कोणाबरोबर तरी येणाऱ्या महिलांना रोखले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘‘अनेक मुली आपल्या प्रियकरांसोबत मशिदीत येतात अशा तक्रारी येत होत्या. एखाद्या महिलेला जामा मशिदीत यायचे असेल तर तिला कुटुंबासह किंवा पतीसोबत यावे लागेल. जर ती कोणाबरोबर नमाज अदा करण्यासाठी आली तर तिला रोखले जाणार नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT