Delhi Manish Sisodia allegation on AAP Arvind kejriwal bjp loksabha election Politics  esakal
देश

‘आप’ला रोखण्यासाठी माझा ‘बळी'; मनीष सिसोदिया

वादग्रस्त उत्पादन शुल्क धोरण : मनीष सिसोदियांचा भाजपवर आरोप

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याभोवती मोदी सरकारच्या तपास यंत्रणांनी फास आवळला असतानाच सिसोदिया यांनी केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठीच भाजप नेतृत्व आपला ‘बळी’ देत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, की केजरीवाल यांच्या प्रमाणिक प्रतिमेची देशभरात हवा असून भाजप नेतृत्व त्यांना घाबरले आहे. आता २०२४ ची लोकसभा लढत ‘मोदी विरुद्ध केजरीवाल' अशी होईल, असेही भाकीत त्यांनी वर्तविले. मोदी यांना अशी सूडबुद्धी शोभत नाही असे सिसोदिया म्हणाले. यावर भाजपने, ‘ केजरीवाल यांच्या २०१४ पासूनच्या पंतप्रधानपदाच्या सुप्त महत्वाकांक्षेने उसळी घेतली आहे. विरोधकांचा पाठिंबा मिळणे अशक्य असल्याचे दिसताच ते पंतप्रधानांवर आरोप करत आहेत,‘ असा उपरोधिक प्रतिहल्ला चढविला.

दिल्लीतील वादग्रस्त उत्पादन शुल्क धोरणातील कथित गैरव्यवहाराबद्दल सिसोदिया यांची सीबीआयने चौकशी केल्यावर या प्रकरणात ‘ईडी’ची एन्‍ट्री होणे निश्चित आहे. सिसोदिया यांच्याविरूद्धचे आरोप व सीबीआयकडील पुरावे पहाता सिसोदिया यांना कधीही अटक होऊ शकते. काल सकाळी सिसोदिया यांची चौकशी सुरू झाल्यापासून किमान १० पत्रकार परिषदा घेण्यात आल्या आहेत. दिल्लीतील शिक्षण धोरणाची स्तुती करणारा मजकूर न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केल्याचा मुद्दा केजरीवाल यांनी काल मांडला होता. भाजपने पुढच्या तासाभरात हाच मजकूर दुबईतील खलिज टाईम्समध्ये जसाच्या तसा छापून आल्याचा प्रतिहल्ला केला. खलिज टाईम्सच्या लेखात, ‘न्यूयॉर्क टाईम्सच्या सौजन्याने‘ असे म्हटल्याचा खुलासा ‘आप’ नेते सौरभ भारद्वाज यांनी केला. मात्र एकाच लेखकाचा एकच लेख-बातमी दोन देशांतील दोन भिन्न प्रकृतीची वृत्तपत्रे जसाच्या तसा छापतात तेव्हा ती जाहिरात किंवा पेड न्यूज ठरत नाही का, या भाजप व पत्रकारितेतील जाणकारांच्या प्रश्नावर ‘आप’ने प्रत्युत्तर दिले नाही.

सिसोदिया म्हणाले, की केजरीवाल हे कडवे प्रामाणिक नेते आहेत. त्यांनी दिल्लीतील शिक्षण व आरोग्य व्यवस्थेचा कायापालट केला. त्यामुळेच भाजप नेतृत्वाने सत्येंद्र जैन अटक केली व काही दिवसांत ते मलाही अटक करतील. गरीब व मध्यम वर्गासाठीच काम करणारे केजरीवाल चांगले काम करणाऱ्यांची प्रशंसा करतात व त्यांच्यापासून प्रेरणा घेतात. मोदी मात्र उद्योगपती मित्रांसाठी, त्यांच्या करमाफीसाठी देशाची तिजोरी वापरतात. चांगले काम करणाऱ्यांना धमकावतात. त्यासाठी ईडी व सीबीआयचा वापर करून घेतात. मात्र कितीही रोखले तरी केजरीवाल यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाणार असून २०२४ची लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध केजरीवाल अशी होणार हे नक्की आहे. उत्पादन शुल्क धोरण देशातील सर्वांत चांगले धोरण आहे असा दावा करून सिसोदिया म्हणाले की आम्ही दिल्लीत हे धोरण प्रामाणिकपणे लागू केले तेच मोदी सरकारला नको होते.

‘दिल्लीत जेथे दारूची दुकाने उघडलीच जाऊ शकत नाही तेथेही ‘आप’ने ती उघडली,‘ हा भाजपचे विधानसभेतील नेते रामवीरसिंह बिधुडी यांचा आरोप सिसोदिया यांनी फेटाळला.पंतप्रधानांनी बुंदेलखंडमध्ये उद्घाटन केलेला एक्प्रेस वे काही दिवसांतच खचला. गुजरातचे दारू माफिया किंवा रस्ता ठेकेदारांकडे सीबीआय गेली नाही व जाणारही नाही कारण हे भाजपचे गैरप्रकार आहेत. केजरीवाल व त्यांची वाढती लोकप्रियता ही भाजपची खरी धास्ती व भिती आहे, असे सिसोदिया म्हणाले.

ही वैफल्यग्रस्त मानसिकता : भाजप

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता, खासदार मनोज तिवारी आदी भाजप नेत्यांनी सिसोदिया यांच्या आरोपांवर उलटवार केला. केजरीवाल यांची पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पुन्हा उफाळून आली आहे. मात्र विरोधी पक्षच त्यांना स्वीकारण्याच्या मूडमध्ये नाहीत. त्यामुळे त्यांनी भाजप व पंतप्रधानांनवर निशाणा साधण्यास सुरवात केली. ही वैफल्यग्रस्त मानसिकता आहे, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT