delhi mcd results 2022 manish sisodia alleges on bjp horse trading delhi politics rak94 esakal
देश

Delhi MCD Results : "भाजपचा खेळ सुरू झालाय"; सिसोदियांचा नगरसेवकांना फोन आल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

Delhi MCD Results 2022 : आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर AAP नगरसेवकांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत.

सिसोदीयांनी ट्विट केलं आहे की, "भाजपचा खेळ सुरू झाला आहे. आमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना फोन येऊ लागले आहेत. आमचा एकही नगरसेवक विकला जाणार नाही. आम्ही सर्व नगरसेवकांना सांगितले आहे की, जर त्यांनी फोन केला किंवा भेटायला आले तर त्यांचे रेकॉर्डिंग घ्या. "

बुधवारी (7 डिसेंबर) MCD निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. एमसीडीच्या 250 पैकी AAP ने 134 जागा जिंकल्या, भाजपने 104 जागा जिंकल्या आणि कॉंग्रेसने 9 जागा जिंकल्या. 3 अपक्षही निवडणुकीत विजयी झाले आहेत.

हेही वाचा - Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

आम आदमी पार्टीने दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत बहुमताने विजय मिळवला असेल, परंतु भारतीय जनता पक्षाने बुधवारी सूचित केले की महापौरपदाची निवडणूक अद्याप बाकी आहे आणि चंदीगडमध्ये त्यांच्या विरोधकांकडे जास्त जागा असून देखील महापौर भाजपचाच आहे.

चंदीगड महानगरपालिकेच्या 35 प्रभागांच्या निवडणुकीत 14 जागा जिंकून AAP सर्वात मोठा पक्ष ठरला, परंतु त्यांना बहुमत मिळाले नाही. भाजपच्या दिल्ली युनिटचे प्रवक्ते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनी दावा केला की त्यांच्या पक्षाचा शहरात पुन्हा एकदा महापौर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT