IIT-Guwahati student held for pledge to join ISIS  
देश

ISISमध्ये सहभागी होण्यासाठी निघाला IITचा विद्यार्थी; मेल पाठवल्यानंतर एकच खळबळ, अखेर...

IIT-Guwahati student held for pledge to join ISIS : दहशतवादी संघटना ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी निघालेला आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

रोहित कणसे

IIT-Guwahati student held for pledge to join ISIS : दहशतवादी संघटना ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी निघालेला आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा विद्यार्थी दिल्लीच्या ओखला येथील राहणारा असल्याचे सांगितले जात आहे. या विद्यार्थ्याचा आयएस इंडिया प्रमुख हारिश फारुकी उर्फ हारिश अजमल फारुखी आणि त्याता सहकारी अनुराग सिंह उर्फ रेहान याच्या अटकेनंतर ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस मगहानिदेशक जीपी सिंह यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, आयएस प्रति निष्ठा जाहीर केल्याप्रकरणी आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो दहशतवादी संघटनेत सहभाग होण्यासाठी निघाला होता. एसटीएफचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक कल्याण कुमार पाठक यांनी सांगितले की इमेल मिळाल्यानंतर आम्ही याचा तपास सुरू केला. हा मेल विद्यार्थ्याने पाठवला होता.ज्यामध्ये त्याने दावा केला होता की तो आयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहे.

पाठक यांनी सांगितलं की यानंतर लगेच आयआयटी गुवाहाटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांना हा विद्यार्थी शनिवार दुपासपासून बेपत्ता आहे. तसेच त्याचा फोन देखील बंद आहे. त्यांनी सांगितलं की तो विद्यार्थी दिल्लीच्या ओखला येथील रहिवासी आहे. त्याला स्थानिक लोकांच्या मदतीने गुहावटीपासून तब्बल ३० किलोमीटर दूर हाजो परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

पाठक यांनी सांगितलं की प्राथमिक चौकशीनंतर त्याला एसटीएफ कार्यालयात आणण्यात आले, त्याच्या हॉस्टेलच्या खोलीमधून आयएस प्रमाणे दिसणारा एख काळ्या रंगाचा झेंडा अढळून आला आहे. तसेच जप्त केलेल्या सामानाची तपासणी केली जात असल्याचे देखील पाठक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT