electrical vehical policy 
देश

दिल्लीत केजरीवालांची भन्नाट स्कीम; इलेक्ट्रिक गाडी खरेदी केल्यास मिळणार पैसे!

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन इलेक्ट्रिकल व्हेइकल पॉलिसी लाँच केली आहे. गुरुवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी याची माहिती दिली. केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी जारी केली. केजरीवाल म्हणाले की, आणखी पाच वर्षांनी जर जगात इलेक्ट्रिक व्हेइकलची चर्चा झाली तर तेव्हा दिल्लीचं नाव सर्वात वर असेल. ही पॉलिसी देशातील सर्वात प्रोग्रेसिव्ह पॉलिसी आहे. जगात जितक्या इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी आहेत त्यापैकी एक चांगली पॉलिसी तयार करण्यात आली आहे. 

इलेक्ट्रिक वाहन पॉलिसीअंतर्गत नव्या वाहन खरेदीवर इन्सेंटिव्ह दिला जाणार आहे. यामध्ये दुचाकी, ऑटोरिक्षा, ई रिक्षा आणि मालवाहतूक वाहनांसाठी 30 हजार रुपयांपर्यंत इन्सेंटिव्ह दिला जाईल. तर इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर दीड लाख रुपयांपर्यंत इन्टेंसिव्ह दिला जाणार आहे. यामध्ये केंद्र सरकार त्यांच्या योजनेअंतर्गत जे देत आहे त्यावर हा इन्सेंटिव्ह असणार आहे. 

याशिवाय Scrapping इन्सेंटिव्हसुद्धा मिळणार आहे. जर तुम्ही तुमचं जुनं पेट्रोल किंवा डिझेल वाहन एक्सचेंज करून नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदी केलंत तर तुम्हाला सरकारकडून इन्सेंटिव्ह मिळेल. अशा पद्धतीचा इन्सेंटिव्ह देशात पहिल्यांदा दिल्लीत दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेइकल खरेदी करण्यासाठी सरकार कर्जावर व्याजात सूट देईल. तसंच सर्व नव्या इलेक्ट्रिक वाहनांचा रोड टॅक्स आणि फी पूर्ण माफ करण्यात येणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार चार्जिंग स्टेशनचं नेटवर्क तयार करणार आहे. एका वर्षात 200 चार्जिंग स्टेशन तयार करण्याचं ध्येय आहे. दर तीन किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन मिळेल यासाठी तयारी केली जात आहे. नवं तंत्रज्ञान असल्यानं तरुणांना प्रशिक्षण दिलं जाईल. इलेक्ट्रिक व्हेइकल संबंधित सर्व कामांसाठी प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्यासाठी नोकऱ्याही उपलब्ध होतील. 

राज्य स्तरावर स्टेट इलेक्ट्रिक व्हेइकल फंड तयार केला जात असून सर्व खर्च याच फंडातून होईल. दिल्लीच्या पातळीवर एक स्टेट व्हेइकल बोर्ड स्थापन केलं जाईल. त्याचे अध्यक्ष परिवहन मंत्री असतील आणि एक राज्य इलेक्ट्रिक व्हेइकल सेल तयार केलं जाईल जो याची अंमलबजावणी करेल. 

केजरीवाल यांनी सांगितलं की, पुढच्या 5 वर्षात दिल्लीत पाच लाख नवीन इलेक्ट्रिक व्हेइकल रजिस्टर करण्यात येतील अशी आशा आहे. येत्या काळात दिल्लीची इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी आणि मॉडेलची चर्चा पुर्ण देशात होईल. मला विश्वास आहे की पाच वर्षानंतर जगातही दिल्लीची इलेक्ट्रिल व्हेइकल पॉलिसी चर्चेत असेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT