UPSC Students Died 
देश

Flooding In Delhi Coaching Centre: कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरलं अन् UPSC चा अभ्यास करणाऱ्या तिघांचा जीव गेला, विद्यार्थी आक्रमक

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- ओल्ड राजेंदरनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका यूपीएससी कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुली असल्याचं समजत आहे. यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तिघांचा या घटनेमध्ये निष्कारण मृत्यू झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं काय घडलं?

दिल्लीमध्ये पाऊस सुरु होता. राव आयएएस स्टडी सर्कलच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी भरायला सुरुवात झाली. त्यामुळे लायब्रेरीत अभ्यास करण्यासाठी गेलेले ३५ विद्यार्थी तेथेच अडकले. काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून तेथून सुटका करून घेतली. पण, काही विद्यार्थ्यांना बाहेर निघता आले नाही. एनडीआरएफची टीम घटनास्थळी आली होती. त्यानंतर पाणी काढण्याचे काम सुरु झाले. पण, याला उशीर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यामध्ये बुडून दोन मुली आणि एका मुलाचा मृ्त्यू झाला आहे. सदर घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कोचिंग सेंटरच्या बाहेर जमा झाले आहेत. त्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोणी तरी याची जबाबदारी घ्यायलाच हवी अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

मंत्री आतिषी यांनी याची दखल घेत प्रशासनाला २४ तासांन रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राव कोचिंग सेंटरमध्ये दररोज ६०० ते ७०० विद्यार्थी कोचिंगसाठी येत असतात. बेसमेंटमध्ये असलेल्या लायब्रेरीमध्ये विद्यार्थी अभ्यास करत असतात.बेसमेंटमध्ये अंधार असल्याने बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता.

एका विद्यार्थ्याने आँखोदेखी सांगितली आहे. तो म्हणाला की, अनेक विद्यार्थी बाहेर निघाले. मी सर्वात शेवटी होतो. दोन मुली निघू शकल्या नाहीत. कारण काहीच मिनिटात १२ फूट पाणी जमा झाले होते. गेटकडून जोरात पाणी येत होतं. पाण्याचे प्रेशर जास्त असल्याने विद्यार्थ्यांना पायऱ्या देखील चढता येत नव्हत्या. पाच मिनिटात बेसमेंटच्या छतापर्यंत पाणी आलं. बेसमेंटची छत १२ फूट उंच आहे. पाणी गढूळ असल्याने विद्यार्थ्यांनी दोरी फेकूनही त्यांना जास्त काही करता आलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

Share Market At Record High: शेअर बाजाराने केला नवा विक्रम, सेन्सेक्स पहिल्यांदाच 84 हजारांवर पोहोचला

SCROLL FOR NEXT