Hawala Operator Mohammad Yasin esakal
देश

दहशतवादी संघटनांना पैसे पुरवणाऱ्या हवाला एजंटला अटक; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातून यासीनला अटक करण्यात आलीय.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातून यासीनला अटक करण्यात आलीय.

Hawala Operator Mohammad Yasin : दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकानं जम्मू कश्मीर पोलिसांसोबत (Jammu Kashmir Police) केलेल्या संयुक्त कारवाईत एका हवाला एजंटला (Hawala Operator) अटक केलीय. दिल्लीतील तुर्कमान गेट येथून या एजंटला अटक करण्यात आलीय. मोहम्मद यासीन असं या एजंटचं नाव आहे.

दहशतवाद्याला पुरवले 10 लाख

यासीन हा लष्कर ए तोयबा (Lashkar e Taiba) आणि अल बद्र सारख्या (LeT and Al Badr) दहशतवादी संघटनांना पैसे पुरवण्याचं काम करत होता. यासीनं कश्मीरमधील एका दहशतवाद्याला 10 लाख रुपये पुरवले होते, ते पैसे नंतर दहशतवादी कारवायांसाठी वापरले गेल्याची माहिती उघड झालीय. दिल्ली पोलिसांना गुप्तचर यंत्रणेकडून मीना बाजार परिसरात एक हवाला एजंट काम करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एका विशेष पथकाची स्थापना करून शोधमोहीम राबवण्यात आली होती.

यासीनला हवालाच्या माध्यमातून मिळाले 24 लाख

आज शुक्रवारी दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातून यासीनला अटक करण्यात आली. यासीनच्या चौकशीत काही महत्त्वपूर्ण माहिती मिळालीय. यासीन हा वास्तविक एक कपडा व्यापारी आहे. तो मीना बाजार परिसरातून काम करतो. पण, कापड व्यवसाय हा लोकांना दाखवण्यासाठी असून तो परदेशाहून येणारा पैसा जम्मू कश्मीरला पाठवण्याचं काम करत होता. तो एका मोठ्या हवाला रॅकेटचा एक भाग आहे. काही दिवसांपूर्वीच यासीनला हवालाच्या माध्यमातून 24 लाख मिळाले होते. त्यातील 17 लाख रुपये त्यांने जम्मू-कश्मीरला पाठवले. याआधी त्यानं 10 लाख रुपये अब्दुल हामिद नावाच्या दहशतवाद्याला पाठवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT