राजधानी दिल्लीतील खराब झालेले प्रदूषण सावरण्याचे नाव घेत नाहीयेय.
राजधानी दिल्लीतील खराब झालेले प्रदूषण सावरण्याचे नाव घेत नाहीयेय. हे पाहता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालयांना गंभीर वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वाहनांचा वापर किमान 30 टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.
शनिवारी सकाळी दिल्लीतील हवेचे सरासरी AQI 499 इतका रेकार्ड केला आहे. जे काल शुक्रवारपेक्षा आज शनिवारी वाईट आहे. खरं तर, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीने हंगामातील सर्वात वाईट AQI नोंदवला आहे. दिल्लीने 24 तासांचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) दुपारी 4 वाजता 471 वर नोंदवला. गुरुवारी AQI 411 नोंदवला गेला.
सीपीसीबीने शुक्रवारी एका बैठकीत सांगितले, सरकारी आणि खाजगी कार्यालये आणि इतर आस्थापनांना सल्ला दिला की, ते वाहनाचा वापर कमीतकमी 30 टक्क्यांनी (घरुन काम करुन, कार-पूलिंग करुन, फील्ड क्रियाकलाप ऑप्टिमाइझ करून) कमी करा. लोकांना बाहेर पडणे मर्यादित आणि कमी करण्याचा सल्ला दिला जातो. आजूबाजूच्या राज्यांमध्ये होरपळ जाळणे आणि दिवाळीनिमित्त फटाक्यांची आतिषबाजी यामुळे राजधानीत प्रदूषण (दिल्ली AQI पातळी) अधिक वाढली आहे. शुक्रवारी दोन भागातील हवेची गुणवत्ता 700 च्या वर नोंदवली गेली. सरासरी हा आकडा 360 वर आहे. याशिवाय राजधानीतील अनेक भाग रेड झोनमध्ये राहिले आहेत.
दिल्ली एनसीआरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषणामुळे विजिबिलिटीवरही परिणाम झाला आहे. हवेत धुक्याची दाट चादर दिसून येत आहे. कुतुबमिनार, लोटस टेंपल, अक्षरधाम मंदिराच्या आसपासच्या भागात धुके आणि कमी दृश्यमानता (विजिबिलिटी) नोंदवण्यात आली. तसेच 'खराब हवे'मुळे लोकांना श्वास घेता येत नाही. शून्य आणि 50 मधील AQI 'चांगला', 51 आणि 100 'समाधानकारक', 101 आणि 200 'मध्यम', 201 आणि 300 'खराब', 301 आणि 400 'अत्यंत खराब आणि 401 आणि 500 'गंभीर' मानले जाते.
तज्ज्ञांचे मत, तात्काळ कारवाईची गरज
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या हवेत 'विष' पसरला आहे, त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तज्ज्ञ रॉय चौधरी यांनी सांगितले की, दिल्लीच्या हवेत पसरलेले धुके ही पब्लिग इमरजेंसी आहे. यासाठी गाड्या, उद्योग, बांधकाम आणि रस्ते यासारख्या धुळीच्या स्रोतांवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे, जसे की कचरा जाळणे आणि धुळीचे स्रोत, हे तात्काळ थांबवणे गरजेचे आहे. जेणेकरुन प्रदुषण आणखी पसरण्यापासून रोखता येईल. तसेच प्रदूषण-स्रोत वाइस आणि हॉटस्पॉट वाइस स्थितीवर देखील काम करण्याची आवश्यकता आहे.
तसेच, दिल्लीत हंगामी धुके खूप दाट आहे. ऑक्टोबरच्या मध्यापासून ते 8 नोव्हेंबरपर्यंत दैनंदिन योगदान गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी आहे. दिल्लीतील या परिस्थितीबाबत तज्ज्ञांनी ही आपत्कालीन परिस्थिती असल्याचे सांगून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. हवेच्या ढासळत्या गुणवत्तेमुळे रुग्णालयांमध्ये श्वसन आणि त्वचेच्या समस्या असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.