Delhi Air pollution sakal
देश

वायू प्रदूषणाचा भस्मासुर, दिल्लीच्या हवेतील विषारी कण वाढले

भारतीयांचे आयुष्य पाच वर्षांनी घटतेय

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशामध्ये वायू प्रदूषणाची समस्या गंभीर रूप धारण करत चालली असून याचा मानवी आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होताना दिसून येतो. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही तर प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आयुष्यातील पाच वर्षे कमी होतील.

शिकागो विद्यापीठातील ‘एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट’ने प्रसिद्ध केलेल्या हवेच्या गुणवत्तेबाबतच्या जीवन निर्देशांकातून ही बाब समोर आली आहे. सध्या दिल्लीतील नागरिक सर्वांत प्रदूषित हवा शरीरामध्ये घेत असल्याचे दिसून आले. दिल्लीच्या हवेतील ‘पीएम-२.५’ कणांचे वार्षिक सरासरी प्रमाण प्रति घनफूट मीटरवर १०७ मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक असून ते ‘डब्लूएचओ’ने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा २१ पटीने अधिक आहे. राजधानातील वायू प्रदूषणाची हीच पातळी कायम राहिल्यास येथील नागरिकांच्या आयुष्यातील दहा वर्षे कमी होतील, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. मागील वर्षी ‘डब्लूएचओ’ने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हवेतील ‘पीएम-२.५’ कणांचे वार्षिक सरासरी प्रमाण हे प्रति घनमीटर पाच मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक असता कामा नये. याआधी हेच प्रमाण १० मायक्रोग्रॅम प्रति घनफूट एवढे होते.

अन्य धोक्यांपेक्षाही हा धोका मोठा

हवेच्या गुणवत्तेबाबतची सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास जगभरात सर्वच ठिकाणी मानवी आरोग्यसमोर गंभीर आव्हाने निर्माण होऊ शकतात. ‘डब्लूएचओ’च्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला तर वायू प्रदूषणामुळे लोकांची जीवनकांक्षा ही २.२ वर्षांनी कमी होऊ शकते. वायू प्रदूषणाची अन्य धोक्यांशी तुलना केली असता हे प्रमाण कित्येकपटीने अधिक असल्याचे दिसून येते. आता धूम्रपानापेक्षाही वायू प्रदूषण अधिक घातक असून अल्कोहोलचे सेवन आणि अशुद्ध पाण्यापेक्षा हे तीनपटीने अधिक, ‘एचआयव्ही- एड्स’पेक्षा सहापटीने तर दहशतवादी कारवाया आणि अन्य संघर्षापेक्षा ते ८९ पटीने अधिक घातक असल्याचे दिसून आले आहे.

सरासरी आयुर्मानात घट

साधारणपणे २०१३ पासूनचा कालखंड विचारात घेतला तर जगाच्या प्रदूषणामध्ये ४४ टक्क्यांची वाढ झाली असून त्यातही भारतातील प्रमाण हे लक्षणीय आहे. सुक्ष्मकणांमुळे होणारे प्रदूषण हे प्रति घनफूट १३ मायक्रोग्रॅमहून वाढून ते थेट ५६ मायक्रोग्रॅमवर पोचले आहे. ‘डब्लूएचओ’ने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा ते अकरापटीने अधिक असल्याचे दिसून आले आहे. १९९८ पासूनचा काळ विचारात घेतला तर भारतातील प्रदूषण हे ६१.४ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे यामुळे नागरिकांच्या सरासरी आयुर्मानामध्ये २.१ वर्षांची घट झाल्याचे दिसून येते.

विकासामुळे प्रदूषण वाढले

मागील दोन दशकांमध्ये औद्योगिकीकरण, आर्थिक विकासाला गती मिळाल्याने इंधनाचा वापर वाढला असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होताना दिसते. ‘डब्लूएचओ’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हवेतील घातक कणांचे जे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे, त्याची सरासरी पातळी कधीच ओलांडण्यात आली असून आजमितीस देशातील १३० कोटी लोक अशा भागांमध्ये राहतात जिथे हे प्रमाण कित्येकपटीने अधिक असल्याचे दिसून येते. गंगेच्या पठारावर पन्नास कोटी लोकांचे वास्तव्य असून देशातील एकूण लोकसंख्येशी याची तुलना केली असता हे प्रमाण ४० टक्के एवढे भरते. याच भागामध्ये हवेतील ‘पीएम-२.५’ या सुक्ष्मकणांचे प्रतिघनफूट प्रमाण हे २०२० मध्ये ७६.३ मायक्रोग्रॅम एवढे होते.

दक्षिण आशिया अधिक प्रदूषित

आज जगातील ७.४ अब्ज एवढी लोकसंख्या अशा प्रदेशामध्ये वास्तव्यास आहे जिथे ‘पीएम-२.५’ कणांचे हवेतील प्रमाण ‘डब्लूएचओॅने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा कित्येकपटीने अधिक आहे. या प्रदूषणाचा दक्षिण आशियायी देशांना मोठा फटका बसला असून भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमधील एक तृतीयांश लोकसंख्येला प्रदूषित हवा घ्यावी लागते आहे. जगातील पाच आघाडीच्या प्रदूषित देशांमध्येही त्यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: महायुतीत तणाव? एकाच मतदारसंघात अजित पवार अन् एकनाथ शिंदेंचा उमेदवार आमने-सामने, आता प्रचार कुणाचा करणार?

Satara Elections : पाटणला 'मविआ'मध्ये बंडखोरी! 89 जणांची माघार, 109 जण रिंगणात; फलटण, वाईत दोन्ही राष्ट्रवादीतच लढत

X Block Feature : हे काय नवीन! ब्लॉक केलेल्या X अकाउंट्सवरून पाहता येणार शेअर केलेले पोस्ट अन् फॉलोवर्स,काय आहे नवं फीचर?

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखीन एक पिस्तूल जप्त

तुमचं लग्न का तुटलं? घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलली दीप्ती देवी; म्हणाली- जेव्हा एकमेकांना समजून...

SCROLL FOR NEXT