Sahil accused of the 16-year-old girl murder case in Delhi has been arrested  
देश

Sakshi Murder Case: साहिलनं 15 दिवसांपूर्वीच खरेदी केला होता चाकू; पोलिसांसमोर केले अनेक धक्कादायक खुलासे

दिल्लीतील अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेतील आरोपीनं अनेक दिवसांपासूनच तरुणीच्या हत्येची तयारी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत घडलेल्या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेतील आरोपी साहिल यानं अनेक दिवसांपासूनच तरुणीच्या हत्येची तयारी केली होती. यासाठी त्यानं पंधरा दिवसांपूर्वीच चाकू खरेदी केला होता. यांसह अनेक धक्कादायक खुलासे त्यानं पोलिसांच्या चौकशीत केले आहेत. (Delhi Sakshi Murder Case 15 days before Sahil brought knife and many shocking revelations during prob)

दिल्लीतील शहाबाद डेअरी भागात एका १६ वर्षीय तरुणीचा चाकूनं अनेक वार करत तसेच डोक्यात दगड घालून तरुणानं हत्या केली होती. या हत्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. प्रमुख आरोपी साहिलनं सांगितलं की, त्यानं १५ दिवसांपूर्वी हत्येसाठी वापरण्यात येणारा चाकू आठवडे बाजारातून खरेदी केला होता. पण हा चाकून त्यानं कुठून खरेदी केला हे सांगितलेलं नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. (Sakshi Murder Case)

पोलीस याची देखील चौकशी करत आहेत की, आरोपीनं हत्या स्वतःहून केली की त्याला कोणी यासाठी उसकवलं होतं. पण आरोपीनं चौकशी दरम्यान धक्कादायक विधान केलं की, साक्षीच्या हत्येचा त्याला कोणताही पस्तवा नाही. हत्येनंतर त्यानं स्वतःचा फोन बंद करुन उत्तर प्रदेशातील बुलंदशहरकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला तिथून ताब्यात घेतलं आणि आज कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (Latest Marathi News)

ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून एका गल्लीत त्यानं साक्षीवर सुमारे ३५ ते ४० वार केले. इतकंच नव्हे तर त्यानं बाजू पडलेला दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. सर्वात लाजीरवाणी बाब म्हणजे तो दिवसाढवळ्या हे कृत्य करत असताना त्या गल्लीतील रस्त्यावरुन अनेक लोक ये जा करत होते. पण कोणीही क्षणभरही तिथं थांबलं नाही की कोणी त्याला हे कृत्य करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT