Sharad Pawar Sakal
देश

दिल्लीत भाजपविरोधात ‘राष्ट्र मंच’ची रणनिती; आज होणार खलबते

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रीय झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वातावरण तापले आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील (Mahrashtra) महाविकास आघाडी सरकारच्या Mahavikas Aghadi Government) स्थैर्याबद्दल तर्कवितर्क लढविले जात असतानाच सरकारचे संकटमोचक असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) घेरण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी बनविण्याची रणनिती आखली आहे. ‘राष्ट्र मंच’ (Rashtra Manch) या नावाने संभाव्य आघाडीची चर्चा रंगली असून यामुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. (Delhi Sharad Pawar Modi Government Politics Rashtra Manch Aghadi)

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रीय झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जींच्या विजयात मोलाचा वाटा असलेले व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यात राष्ट्रीय पातळीवर इतर विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर आज दिल्लीमध्ये प्रशांत किशोर हे शरद पवार यांना पुन्हा एकदा भेटले. दीड तास चाललेल्या या बैठकीतील चर्चेचे मुद्दे गुलदस्तात असतानाच उद्या (ता. २२) पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि ‘राष्ट्र मंच’ या नावाखाली राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची बैठक होणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवार यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राष्ट्र मंच’ हा वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचे व्यासपीठ असून त्यांच्या पुढाकारानेच ही बैठक होत आहे. केवळ सोयीचे ठिकाण म्हणून पवार यांचे निवासस्थान निवडले आहे. स्वतः शरद पवार यांनी ही बैठक बोलावलेली नाही, असा दावा या सूत्रांनी केला. या बैठकीमध्ये विद्यमान राजकीय परिस्थिती, देशाच्या अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था आणि कोरोनाचे परिणाम यावर चर्चा होऊ शकते. यासाठी फक्त राजकीय पक्षांच्याच नव्हे तर अन्य क्षेत्रातील मंडळींचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बैठकीसाठी येणारे नेते

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांनी या बैठकीत सहभागी होणाऱ्यांची यादी ट्विटद्वारे प्रसिद्ध केली आहे. यानुसार, यशवंत सिन्हा, पवन वर्मा, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, भाकप सरचिटणीस डी. राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, न्या. ए. पी. शाह, जावेद अख्तर यासोबतच आशुतोष, माजिद मेमन, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, के. सी. सिंह, सुधींद्र कुलकर्णी, कोलिन गोन्साल्विस, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, घनश्याम तिवारी, प्रितीश नंदी, ‘राजद’चे मनोज झा यांच्यासह काँग्रेसचे खासदार के. टी. एस. तुलसी आणि काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले माजी प्रवक्ते संजय झा यांचा समावेश असेल.

काँग्रेसमध्ये अस्वस्थता

काँग्रेसेतर पक्षांची आघाडी स्थापनेची चर्चा रंगली असताना काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसने अधिकृतपणे यावर भाष्य करण्याचे टाळले असले तरी ही बैठक राजकीय स्वरुपाची असल्याचे पक्षाचे मानणे आहे. यासाठी काँग्रेसला निमंत्रण का दिले नाही हे संयोजकांना विचारा, अशी टिप्पणी काँग्रेसच्या सूत्रांनी केली. तसेच पक्षाच्या सहभागाबाबत बोलण्याचे टाळले. मात्र, पक्षाचे खासदार असलेल्या के. टी.एस. तुलसी यांचा निमंत्रितांमध्ये समावेश असल्याकडे लक्ष वेधले असता, पक्षाचे अधिकृत म्हणणे त्यांना कळविले जाईल, असेही या नेत्याने स्पष्ट केले.

तिसरी, चौथी आघाडी अशक्य - प्रशांतकिशोर

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांतकिशोर यांनी आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुन्हा भेट घेतल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. या भेटीनंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीसोबत बोलताना मात्र त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘माझा तिसरा किंवा चौथ्या आघाडीवर विश्‍वास नाही कारण या आघाड्या भाजपला आव्हान देऊ शकतील असे वाटत नाही.’ असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chetan Tupe won Hadapsar Assembly Election 2024: हडपसरमधील परंपरा मोडत चेतन तुपे यांचा विजय; प्रशांत जगताप यांचा पराभव

UP By Election: उत्तरप्रदेशात सुद्धा भगवे यश! पोटनिवडणुकीत योगींनी लोकसभेचे अपयश धुवून काढले, जाणून घ्या करणे

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Nanded Lok Sabha By Election Result 2024 : पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा झटका; गमावलेली नांदेडची जागा भाजपनं जिंकली

BJP Pravin Datke Won Nagpur Central Election : नागपूर मध्यचा गड भाजपने राखला, भाजपचे प्रवीण दटके 11516 मतांनी विजयी

SCROLL FOR NEXT