Delhi Weather Update Sakal
देश

Delhi Weather Update : दिल्लीत पथारीवाल्यांना उन्हाच्या झळा; व्यवसाय ५० टक्क्यांनी घटला

‘ग्रीनपीस इंडिया’ आणि ‘नॅशनल हॉकर फेडरेशन’ने दिल्लीतील ८० टक्के एवढ्या पथारीवाल्यांची पाहणी केली असता त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीला वारंवार उष्णतेच्या लाटेचा फटका बसू लागला असून याचे विपरीत परिणाम शहराच्या अर्थकारणावर देखील होऊ लागले आहेत. यंदाच्या एप्रिल ते मे या काळात वाढत्या उष्णतेमुळे पथारीवाल्यांचा व्यवसाय ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.

‘ग्रीनपीस इंडिया’ आणि ‘नॅशनल हॉकर फेडरेशन’ने दिल्लीतील ८० टक्के एवढ्या पथारीवाल्यांची पाहणी केली असता त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मीना बझार, जुना दिल्ली रेल्वे स्थानक परिसर, लाल किल्ला परिसर, नेहरू पॅलेस, गुरू तेगबहाद्दूर नगर, करोल बाग, इंडिया गेट, जनपथ, चांदणी चौक, सदर बझार रस्ता, साकेत, सरोजिनी मार्केट आदी ठिकाणांवरील व्यवसायाला उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या.

या सर्वेक्षणामध्ये सातशे विक्रेत्यांची मते जाणून घेण्यात आली होती. या सर्वेक्षणामध्ये आरोग्य, उत्पादकता आणि रोजीरोटीवरील परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला होता. पथारीवाल्यांचा उष्णतेपासून बचाव व्हावा म्हणून बाजारपेठेमध्ये वेगळी सोय करण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यासाठी सरकारने संघटनात्मक पाठबळ देणे गरजेचे आहे, असे मत ‘नॅशनल हॉकर फेडरेशन दिल्ली’चे समन्वयक संदीप वर्मा यांनी मांडले.

ग्राहक घटले

पाहणी करण्यात आलेल्यांपैकी ८०.०८ टक्के विक्रेत्यांनी आमच्या ग्राहकांची संख्या घटल्याचे मान्य केले तर ४९.२७ टक्के विक्रेत्यांनी टोकाच्या हवामान बदलामुळे आम्हाला आर्थिक नुकसान सोसावे लागल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांच्या शारीरिक समस्यांतही वाढ झाल्याचे दिसून येते.

जेवणाची इच्छा नाही

अनेक पथारीवाल्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला असून मध्यमवयातील महिलांच्या मासिक पाळीमध्येही त्यामुळे अनियमितता आल्याचे दिसून येते. काही महिलांना निद्रानाशाचाही त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. दिवसभर उन्हामध्ये काम केल्यानंतर रात्री घरी जाऊन जेवण करण्याचीही माझी इच्छा होत नाही असे स्थानिक विक्रेती गुड्डी यांनी सांगितले.

प्रशिक्षणच दिले नाही

तीव्र उष्णतेच्या लाटेला कशापद्धतीने सामोरे जायचे? याचे आम्हाला पुरेसे मार्गदर्शनच मिळू शकलेले नाही अशी खंत काही पथारीवाल्यांनी व्यक्त केली. अनेकांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने शक्य असूनही त्यांना उपचार घेता आले नाहीत. केवळ २७ टक्के पथारीवाल्यांनाच घरच्या गरजा पूर्ण करून वैद्यकीय उपचार घेणे शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT