Kisan Mahapanchayat Esakal
देश

Kisan Mahapanchayat: दिल्लीचं टेन्शन वाढलं! शेतकऱ्यांच्या दुसऱ्या गटाने घेतला मोठा निर्णय

Kisan Mahapanchayat: संयुक्त किसान मोर्चाकडून गुरूवारी(१४ मार्चला) दिल्लीच्या रामलीला मैदानावर किसान महापंचायत बोलावली आहे. या महापंचायतीसाठी देशभरातील शेतकरी, जास्त प्रमाणात उत्तर भारतीतील शेतकरी यावेळी उपस्थित असणार आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीतील शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. संयुक्त किसान मोर्चाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चाकडून गुरूवारी(१४ मार्चला) दिल्लीच्या रामलीला मैदानावर किसान महापंचायत बोलावली आहे. या महापंचायतीसाठी देशभरातील शेतकरी, जास्त प्रमाणात उत्तर भारतीतील शेतकरी यावेळी उपस्थित असणार आहेत. मात्र, अद्याप शेतकरी संघटनांना दिल्ली पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. युनायटेड किसान मोर्चाच्या चार सदस्यांची समिती अजूनही दिल्ली पोलीस आणि एमसीडीच्या अधिकाऱ्यांकडून महापंचायत आयोजित करण्याची परवानगी घेण्याचा प्रयत्न करत आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिस उपायुक्त हर्षवर्धन आणि संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांच्या बैठका झाल्या आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे सदस्य मिंदर सिंग पटियाला यांनी सांगितले की ८ मार्च रोजी दिल्ली पोलिस उपायुक्तांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी या बैठकीसाठी सकारात्मकता दाखवली आहे. ते पुढे म्हणाले की, दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) च्या अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी परवानगी (NOC) दिली तर दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) देखील शेतकऱ्यांना महापंचायत घेण्यासाठी परवानगी (NOC) देईल.

संयुक्त किसान मोर्चा ही शेतकऱ्यांची तीच संघटना आहे, जिने 2020-21 च्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. किमान आधारभूत किंमत (MSP) कायद्यासह शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वी 'किसान महापंचायत' आयोजित करण्याची घोषणा केली होती. बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाचे दुसरे नेते दर्शन पाल म्हणाले की, पंजाबचे शेतकरी महापंचायतीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यास उत्सुक आहेत. महापंचायत शांततेत पार पडेल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर देशभरातील शेतकरी ट्रॅक्टरने न येता बस किंवा ट्रेनने येतील.

त्याचबरोबर एका प्रश्नाचे उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, देशात निवडणुका होवो अथवा न होवो आमचा त्याच्याशी काहीही संबध नाही. आमच्या मागण्या पुर्ण होईपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहिल. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, त्यांचा उद्देश आहे की, राजकीय पक्षांच्या घोषणापत्रात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा समावेश करणे.

लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीतील रामलीला मैदानावर किसान महापंचायतीची हाक दिली आहे, तर दुसरीकडे बिगरराजकीय किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि युनायटेड किसानच्या बॅनरखाली शेकडो शेतकरी, पंजाबमधील खनौरी आणि शंभू येथे मोर्चा निदर्शने करत आहेत.गेल्या २८ दिवसांपासून ते सीमेवर बेमुदत संपावर बसले आहेत. आतापर्यंत या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर-ट्रॉलीने दिल्लीकडे मोर्चा काढण्याची परवानगी मिळू शकलेली नाही.शेतकऱ्यांच्या दोन्ही गटांच्या मागण्या सारख्याच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT