Lucknow Delivery Boy Murder ESakal
देश

ऑनलाइन फोन मागवला, ऑर्डर द्यायला आलेल्या डिलिव्हरी बॉयला दोघांनी संपवले, मृतदेहाचे तुकडे करून फेकले, कारण काय?

Vrushal Karmarkar

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका डिलिव्हरी बॉयची निर्घृण हत्या करण्यात आली. दोन तरुणांनी ही हत्येची घटना घडवली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. चौकशीदरम्यान त्याने हत्येमागचे कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना राजधानी लखनऊमधील चिन्हाट पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या महिन्यात, 24 सप्टेंबर रोजी फ्लिपकार्ट कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने भारत सात्रीख रोड येथील गो डाऊनमधून माल उचलला आणि डिलिव्हरीसाठी निघून गेला. दोन मोबाईल फोन देण्यासाठी तो चिन्हाट येथे गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. यामुळे कुटुंबीय प्रचंड भयभीत झाले. त्यांनी चिन्हाट पोलीस ठाणे गाठून भरत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

बेपत्ता झाल्याची नोंद केल्यानंतर पोलिसांनी भरतचा शोध सुरू केला. तीन-चार दिवस पोलिसांना त्याच्याबाबत काहीही मिळाले नाही. यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबरवर पाळत ठेवली असता, त्याचे शेवटचे लोकेशनही चिन्हाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घराजवळ सापडले. गेल्या रविवारी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलिसांच्या चौकशीत दोघांनीही निशातगंज येथील डिलिव्हरी बॉय भरत याच्या हत्येची कबुली दिली.

मात्र, ही हत्या कोणत्या कारणाने आणि निर्दयतेने करण्यात आली हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले. आरोपींनी सांगितले की, त्यांनी दोन मोबाईल फोन फ्लिपकार्टवर ऑर्डर केले होते. २४ सप्टेंबर रोजी डिलिव्हरी बॉय भरत हा फोन डिलिव्हरी करण्यासाठी आला. आरोपींनी मोबाईल काढून घेतला, मात्र त्यांच्याकडे पैसे नव्हते. यावर त्याने भरतची हत्या करून मोबाईल फुकट मिळवण्याचा विचार केला. त्यानंतर दोघांनी मिळून भरतची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरून बाराबंकी येथील इंदिरा कालव्यात फेकून दिले.

दोन्ही आरोपींच्या सांगण्यावरून पोलीस मृतदेहाचा शोध घेण्यास व्यस्त आहेत, मात्र अद्यापपर्यंत मृतदेहाचा पत्ता लागलेला नाही. पोलीस आणि एसडीआरएफचे गोताखोर इंदिरा कालव्यात मृतदेहाचा शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, हत्येतील आरोपींची नावे गजानंद आणि आकाश अशी आहेत. दोघांना अटक करून चौकशी करण्यात येत आहे. मृतदेहाचा शोध सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT