ram rahim Sakal
देश

निवडणुकीपूर्वी राम रहीम बाहेर; पंजाबमधील राजकीय समीकरणं बदलणार?

निवडणुकांपूर्वी राम रहीमला फर्लो मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

चंदीगढ : कारागृहात बलात्काराच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) याला 21 दिवसांची फार्लो मंजुर करण्यात आल्याचे वृत्त आहे. रामरहिम 2017 पासून डेरा प्रमुखाची पहिल्यांदाच तुरुंगातून सुटका होणार असून, आज संध्याकाळपर्यंत तो कारागृहातून बाहेर येऊ शकतो, अशी माहिती आहे. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त प्रकाशित केले आहे. (Ram Rahim Latest News In Marathi)

फर्लो (furlough Bail) रजा म्हणजे ठराविक कालावधीसाठी मंजूर केलेली तात्पुरती रजा होय, जी कायद्याच्या बाबतीत सामान्यतः दीर्घ कारावास भोगणाऱ्या कैद्यांना दिली जाते. दरम्यान, पंजाब विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी (Punjab Assembly Election 2022) राम रहीम फर्लो मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंजाबमध्ये येत्या 20 फेब्रुवारी रोजी 117 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.

गुरमीत राम रहीमला 2017 मध्ये दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर, विशेष सीबीआय न्यायालयाने रहीम याला 2002 मध्ये डेराचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंग यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. तर इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या हे सर्व रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंचकुला कोर्टाने राम रहीम आणि अन्य चार जण कृष्णलाल, जसबीर सिंग, अवतार सिंग आणि सबदील यांना 8 ऑक्टोबर रोजी खून प्रकरणात दोषी ठरवले होते. या प्रकरणी सीबीआयने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने डेरा प्रमुखाला 31 लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून नुकसानभरपाई म्हणून पीडितेच्या कुटुंबाला अर्धी रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT