devasahayam pillai becomes first indian declared saint by pope francis  
देश

देवसहायम पिल्लई यांना पोपकडून संतपद बहाल; ठरले पहिले भारतीय

सकाळ डिजिटल टीम

पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी रविवारी व्हॅटिकन येथे देवसहायम पिल्लई (Devasahayam Pillai) यांना संत ही पद बहाल करण्यात आले. पिल्लई यांनी 18व्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. देवसहायम पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना पोपने संत घोषित केले आहे

देवसहायम यांना पवित्र आत्मा म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शिफारस कोट्टर धर्मक्षेत्र, तामिळनाडू बिशप्स कौन्सिल आणि भारतीय कॅथोलिक बिशप परिषदेच्या विनंतीवरून 2004 साली करण्यात आली होती. पोप फ्रान्सिस (85) यांनी रविवारी व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स बॅसिलिका येथे कॅनोनायझेशन प्रदान करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रार्थना सभेत देवसहायम पिल्लई यांना संत घोषित केले.

2004 मध्ये, कोट्टर डायोसीज, तमिळनाडू बिशप्स कौन्सिल आणि कॅथोलिक बिशप्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी व्हॅटिकनला बीटिफिकेशन प्रक्रियेत त्यांचा समावेश करण्याची शिफारस केली. देवसहायम पिल्लई यांनी 1745 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यांचे नाव बदलून 'लाजरस' केले. याचा अर्थ देवांना मदत करणारा असाही होतो.

पिल्लई यांच्या चमत्कारिक परोपकारी कार्याला पोप फ्रान्सिस यांनी 2014 मध्ये मान्यता दिली होती. यामुळे त्यांना (पिल्लई) 2022 मध्ये संत घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना संत घोषित करण्यात आले आहे.

देवसहायम यांचा जन्म 23 एप्रिल 1712 रोजी हिंदू नायर कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव नीलकंठ पिल्लई आहे. ते तत्कालीन त्रावणकोर राज्याचा भाग असलेल्या कन्याकुमारी येथील नट्टालम येथील रहिवासी होते. ते त्रावणकोरचे महाराजा मार्तंड वर्मा यांच्या दरबारात कर्मचारी होते. डच नेव्हीच्या कमांडरने त्याला कॅथलिक धर्माची दीक्षा दिली. 2 डिसेंबर 2012 रोजी देवासहायम यांना त्यांच्या जन्मानंतर 300 वर्षांनी कोत्तर येथे सौभाग्याशाली घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT