development of states is the development of country Narendra Modi Inauguration of development projects in Telangana Sakal
देश

PM Narendra Modi : राज्यांचा विकास हाच देशाचा विकास; नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; तेलंगणमध्ये विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन

‘‘राज्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, ही भावना मनात ठेवूनच आमचे सरकार काम करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

हैदराबाद : ‘‘राज्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, ही भावना मनात ठेवूनच आमचे सरकार काम करत आहे. देशातील १४० कोटी जनतेनेही आता विकसित भारताचा दृढनिश्‍चय केला आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. तेलंगणमधील संगारेड्डी येथे त्यांनी सुमारे ७,२०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन केले.

कार्यक्रमावेळी झालेल्या भाषणात मोदी म्हणाले,‘‘तेलंगणच्या विकासासाठी केंद्र सरकार मागील दहा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पातही या राज्यातील पायाभूत सुविधांसाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कालच (ता. ४) आदिलाबाद येथे ५६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्‌घाटन झाले आहे. विकसित भारत घडविण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्‍यक आहे. राज्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल.’’

पंतप्रधानांनी आज उद्‌घाटन व भूमिपूजन केलेले प्रकल्प रेल्वे, रस्ते, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रांशी संबंधित आहेत. मोदींनी आज नागरी हवाई वाहतूक संशोधन संघटना केंद्राचे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. याशिवाय, पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या २९ किमी लांबीच्या सहा पदरी टप्प्याचेही भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

युवा नेत्यांची काँग्रेसला भीती

संगारेड्डी येथे झालेल्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले,‘‘आपल्याच पक्षातील युवा नेत्यांना मोठी जबाबदारी देण्याची काँग्रेसला भीती वाटते. पन्नाशीच्या आतील कोणालाही ते संधी देत नाहीत.

वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या नेत्यांनाच ते पदे देतात. घराणेशाही जपणारे पक्ष माझ्यावर टीका करतात कारण आमच्या सरकारने त्यांचे हजारो कोटी रुपयांचे गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत. मी कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही, पण घराणेशाहीला माझा तीव्र विरोध आहे.

ज्या राज्यांत घराणेशाहीचे सरकार आहे, त्या राज्यांची अधोगती झाली आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्र आता माझ्या ‘परिवारा’वर टीका करत आहेत. शिवाय, आमचा मोदींशी वैचारिक लढा आहे, असेही ते म्हणत आहेत.’’ यानंतर मोदी ओडिशा येथेही एक सभा घेतली. येथेही त्यांनी ‘मेरा भारत- मेरा परिवार’ असा नारा देत विरोधकांच्या घराणेशाहीवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICSE, ISC Exam Schedule: दहावी, बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; 'असं' डाऊनलोड करा

IPL 2025 Mega Auction Live Streaming: अर्जुन तेंडुलकर आता मुंबई इंडियन्सला नकोसा झाला, ३० लाखांतही कोणी बोली नाही लावली

Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उद्या अंतिम युक्तिवाद

Porsche Car Accident : आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचा अर्ज दाखल

Vaibhav Suryavanshi IPL Auction: नावातच 'वैभव'! १३ व्या वर्षी सूर्यवंशी झाला करोडपती; द्रविडच्या मार्गदर्शनाखाली RR कडून खेळणार

SCROLL FOR NEXT