Air Asia Fined Rs. 20 Lakh By DGCA : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी DGCA ने Air Asia ला 20 लाखांचा दंड ठोठावला आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
नागरी उड्डाण आवश्यकतांचे उल्लंघन केल्याबद्दल DGCA ने ही कारवाई केली आहे. प्रशिक्षणादरम्यान एअर एशियाच्या वैमानिकांनी DGCA च्या नियमांचे पालन केले नसल्याचे म्हटले आहे.
Air Asia कडून करण्यात आलेल्या या नियमांच्या उल्लंघनप्रकरणी अखेर DGCA कडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, या प्रकरणी Air Asia ला 20 लाखांचा दंड ठोठावला आहे.
दुसरीकडे DGCA कडून गेल्या काही दिवसांपासून कारवाई विमान कंपन्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी एअर इंडियातील विमान प्रवासादरम्यान महिला सहप्रवासाच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी DGCA ने मोठी कारवाई केली होती. नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
याशिवाय कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल फ्लाइटच्या पायलट-इन-कमांडचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. तसेच एआयच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सर्व्हिसेसवर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
तसेच 26 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या घटनेची तक्रार न केल्याबद्दल 30 लाखांच्या दंडाशिवाय एअर इंडियाला वेगळा 10 लाखांचा दंड ठोठावला आहे.
26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा या प्रवाशाने वृद्ध महिलेवर लघवी केली होती. या घटनेनंतर पीडित महिलेने दुसऱ्याच दिवशी विमान कंपनीकडे लेखी तक्रार केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.