भोपाळ : एखाद्याच्या बोटाला जखम जरी झाली, तरी मोदीजी ट्विट करुन बोलतात. मात्र काही लोक स्वतःला साधू म्हणून घेणारे जाहीरपणे बलात्कार आणि माथे भडकवण्याचे काम करत आहेत. तरीही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही. दंगली-जाळपोळ होत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गप्प आहेत, अशी घणाघाती टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी मोदींवर केली आहे. ते एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. मध्य प्रदेशातील खरगोन हिंसाचाराबाबत सिंह यांनी ट्विट केले होते. (Digvijaya Singh Attack On PM Narendra Modi Over Violence In Across Country)
त्यावरुन भोपाळ गुन्हे शाखेने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविला आहे. ट्विटवर एक छायाचित्र पोस्ट करुन दिग्विजय सिंह लिहितात, धार्मिक स्थळावर तलवार आणि ध्वज लावणे योग्य आहे का? खरगोन प्रशासनाने परवानगी दिली होती का ? मात्र ट्विट केलेले छायाचित्र खरगोन किंवा मध्य प्रदेशमधील नव्हते. ते होते बिहारमधील मुझफ्फरपूरचे.
ही चूक लक्षात येताच त्यांनी पोस्ट डिलिट केली. मात्र यावरुन भाजपने दिग्विजय यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. तसेच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही ट्विटवर आक्षेप घेतला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.