Discrimination by Ukrainian authorities Discrimination by Ukrainian authorities
देश

युक्रेनियन अधिकाऱ्यांकडून भारतीयांशी भेदभाव; मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू असताना भारतीय आणि नायजेरियन नागरिकांना सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जात नाही आहे. युक्रेनियन अधिकारी स्वतःच्या नागरिकांनाच परवानगी (Discrimination by Ukrainian authorities) देत ​​​​आहेत. आम्हाला परवानगी नाकारली जात आहे. आम्हाला सीमेवर जाण्यासाठी सुमारे १५ किलोमीटर चालावे लागले, असा आरोप भारतीय विद्यार्थ्यांनी केला. प्रवीण कुमार अशी त्याने स्वत:ची ओळख सांगितली.

युद्धग्रस्त युक्रेनमधून बाहेर काढलेल्या आणि सोमवारी सकाळी नवी दिल्लीत दाखल झालेल्या भारतीय विद्यार्थ्याने रशियाच्या आक्रमणादरम्यान ते पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून भारतीय नागरिकांशी भेदभाव (Discrimination against Indian citizens) केला जात असल्याचे प्रवीण कुमारने सांगितले. नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेवर बरीच अनिश्चितता आहे. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. मुख्य समस्या म्हणजे सीमा ओलांडणे आहे, असे शुभम कुमार या विद्यार्थ्याने सांगितले. पोलंड सीमेवर युक्रेनियन रक्षकांकडून विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे व मारहाण केली जात आहे, असा दावा कुमार यानी केला.

युद्धग्रस्त वातावरणातून मायदेशी परतण्यासाठी भारतीय विद्यार्थी सीमा तपासणी बिंदूंवर उणे ४ अंशांपेक्षा कमी तापमानात उद्यानांमध्ये झोपले आहेत. अनेकांनी मदतीसाठी आवाहन केले. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओही शेअर केले. मात्र, भारत सरकारने त्यांना वाट पाहण्याची विनंती केली आहे. हंगेरी, पोलंड, स्लोव्हाक प्रजासत्ताक आणि रोमानियाच्या सीमेवर अडकलेल्या लोकांना भारत बाहेर काढत आहे. कारण, राजधानी कीवसह अनेक शहरांवर रशियनाने बॉम्बहल्ला केल्यानंतर युक्रेनियन हवाई क्षेत्र बंद करण्यात आले होते.

समन्वय न ठेवता सीमा चौकीवर जाऊ नका

भारतीय नागरिकांनी हेल्पलाइन क्रमांक वापरून तेथील भारतीय सरकारी अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमा चौकीवर जाऊ नका. युक्रेनमधील (Ukrain) सर्व भारतीय नागरिकांनी सीमावर्ती चौक्यांवर भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी आणि भारतीय दूतावास, कीवच्या आपत्कालीन क्रमांकाशी पूर्व समन्वय न ठेवता कोणत्याही सीमा चौकीवर जाऊ नका, असे युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सांगितले. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने एक समर्पित ट्विटर हँडल देखील सेट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT