भोपाळ - देशातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट (Second Wave) ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका कायम असून त्याला सामोरे जाण्याची तयारी रेल्वे विभागही करीत आहे. कोरोनाचा विषाणू (Coronavirus) ओळखण्यासाठी रेल्वे खास संवेदनशील डबे तयार करीत आहे. या डब्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर हा विषाणू नष्ट (Disinfection Techniques) होणार आहे. यासाठी प्रतिपिंड (प्लाझ्मा) उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. हवेच्या माध्यमातून या तंत्राद्वारे कोरोना विषाणू नष्ट करण्याची व्यवस्था या डब्यामध्ये असेल. (Disinfection Techniques in Special Railway Coaches)
रेल्वेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. हा विशेष डबा सर्वांत प्रथम ‘शान-ए-भोपाळ एक्स्प्रेस’ला जोडला जाणार आहे. वातानुकूलित श्रेणीत (एसी) असा एक डबा जुलैपर्यंत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विजय प्रकाश म्हणाले की, कोरोना विषाणू ओळखणारा डबा शान-ए-भोपाळ एक्स्प्रेससाठी मिळाल्यानंतर त्याची तातडीने चाचणी सुरू करण्यात येईल. कोरोनाची साथ रोखण्यासाठी रेल्वेने ‘लिंक हॉफमेन बुश’ (एलएचबी) या प्रकारच्या डब्यांचे रूपांतर कोरोना संवेदनशील डब्यात करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यासाठी ‘एसी’ डब्यात ‘प्लाझ्मा एअर’ उपचार पद्धतीने कोरोनाचा प्रसार करणारा विषाणू काही तासातच नष्ट होईल. असा डबा ‘एसी’सह सामान्य श्रेणीसाठीही तयार करण्यात येईल.
निशातपुरा कारखान्यावर जबाबदारी
भोपाळमधील निशातपुरा येथे उत्पादन विभागात असे डबे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. काही ‘एचएलबी’ डब्यात देखभाल व दुरुस्तीच्यावेळी त्यात कोरोना संवेदनशील व्यवस्था उभारली जाऊ शकते. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून लवकरात लवकर काम मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
डब्यांचे वैशिष्ट्य
दरवाजाच्या कड्यांना तांब्याचा मुलामा असेल
मानवी स्पर्श कमी होईल याची खबरदारी
डब्यात टायटेनियम डाय ऑक्साईडचे आवरण असेल ज्यावर कोरोनाचा विषाणू अस्तित्वात राहू शकत नाही
स्वच्छतागृहातील नळ, सोप डिस्पेन्सर ‘टचलेस’ असेल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.