Doctor rakhamabai raut Indias first woman practicing doctor  
देश

डॉक्टर रखमाबाई राऊत: भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आपल्या सर्वांना आनंदीबाई जोशी यांचे नाव माहिती आहे. त्यांचे कार्य आणि त्यांची जिद्द आपण सर्वांनीच सिनेमाच्या आणि पुस्तकांच्या माध्यमातून बघितली आहे. मात्र आनंदीबाई जोशी या पहिल्या प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर नव्हत्या असं म्हंटलं तर अनेकांच्या भुवया उंचावतील. हो. हे खरं आहे. आनंदीबाई जोशी यांचे निधन कमी वयात झाले. त्यामुळे त्या डॉक्टरकीची प्रॅक्टिस करू शकल्या नाहीत. मात्र त्यांच्यानंतर भारतात प्रॅक्टिस करणाऱ्या महिला डॉक्टर म्हणजे रखमाबाई राऊत. आपण आज त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. 

भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टरांपैकी त्या एक होत्या. 1864 साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं. मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या. त्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन हे शल्यविषारद होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी.

आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं अकाली निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या.

बालविवाहाविरुद्ध लढा

रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपल्या बालपणी झालेला विवाह रखमाबाईंना मान्य नव्हता आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला. जस्टिस रॉबर्ट हिल पिंगहे या न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या बाजूनं निकाल दिला. समाजसुधारणेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल असलं तर तत्कालीन महाराष्ट्रात या निकालावर बरीच टीका झाली. या निकालाला आणि त्या अनुषगांने येणाऱ्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याला कडाडून विरोध करणाऱ्यांमधलं एक प्रमुख नाव होत बाळ गंगाधर टिळक.त्यावेळी खरंतर आगरकर केसरी मध्ये होते. बालविवाह प्रतिबंधक कायद्याला टिळकांचा विरोध होता हेच आगरकरांनी केसरी सोडण्याचं एक मुख्य कारण होतं.

असं असतानाही इतिहासानं रखमाबाईंची उपेक्षा का केली? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशा महाराष्ट्रातल्या थोर स्त्रियांच्या यादीत रखमाबाईंचं नाव का येत नाही? स्वातंत्र्यलढा सुरू होता तेव्हा दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचंही वारं वाहात होतं. दोन्ही चळवळींमध्ये मोठी मोठी माणसं जोमानं काम करत होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत लढणाऱ्यांचा इतिहासात प्रामुख्यानं उल्लेख झाला आणि समाजसुधारकांकडे दुर्लक्ष झालं. रखमाबाई बहुजन समाजाच्या होत्या म्हणून त्यांच्या कार्याकडे तत्कालीन इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं 

पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर

त्याकाळात बाईला ब्र काढणंही मुश्कील होतं, तो हा काळ त्यावेळी बंड करणारी, अनिष्ट चाली-रुढींविरोधात एल्गार पुकारणारी आणि त्यासाठी न्यायाव्यवस्थेला गदगदा हलवणारी ही बाई होती. डॉ. रखमाबाई भिकाजी राऊत भारतात डॉक्टरकी म्हणून व्यवसाय करणारी पहिली डॉक्टर अशीही तिची ओळख.भारतातल्या पहिली डॉक्टर होण्याचा मान जरी आनंदीबाई जोशींना मिळत असला, तरी आनंदी जोशींनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली नाही. भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून डॉ. रखमाबाई राऊत हेच नाव इतिहासात लिहिलं गेलं.

फिनिक्सचे यश 

या लग्नातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या रखमेनं त्यानंतर फिनिक्स भरारी घेतली. रखमेनं आधी इंग्रजीचं शिक्षण घेतलं आणि १८८९ साली London School of Medicine for Women मध्ये तिनं प्रवेश घेतला. १८९४ साली डॉक्टर होऊन ती भारतात परतली. सूरतमध्ये मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून तिनं भूमिका बजावली. तिनं परत लग्न केलं नाही आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत सामाजिक कार्यात ती सक्रिय राहिली. ९१ व्या वर्षी डॉ. रखमाबाई राऊत यांचं निधन झालं.

भारतातला पहिला घटस्फोटाचा खटला

रखमा आपल्याबरोबर राहात नाही म्हणून तिच्या नवऱ्यानं बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली. १८८४ साली भारतातल्या पहिल्या घटस्फोटाचा खटला बॉम्बे हायकोर्टात सुरू झाला... मी माझ्या नवऱ्याबरोबर राहणार नाही, हे रखमेनं कोर्टाला ठासून सांगितलं. कोर्टानं रखमेला दोन पर्याय दिले... 'एक तर तू तुझ्या नवऱ्याबरोबर त्याच्या घरी राहायला जा... नाही तर कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाहीस तर तुरुंगात जा...' त्यावेळी, या लग्नामध्ये राहण्यापेक्षा मी तुरुंगात जाईन, असं रखमाबाईंनी कोर्टाला ठणकावलं.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT