Donated Egg For Mosque Construction Got Over 2 Lakhs In Auction In Jammu And Kashmir Esakal
देश

Viral Video: म्हातारीनं मशिदीसाठी दान केलेल्या अंड्यावर लोकांच्या उड्या, लिलावात मिळाली 2 लाखांपेक्षा जास्त किंमत

Donated Egg In Kashmir: दरम्यान, एका वृद्ध महिलेने नाव न सांगण्याची विनंती करत सांगितले की, तिला तिच्या कोंबडीने दिलेले ताजे अंडे दान करायचे होते.

आशुतोष मसगौंडे

Donated Egg Got Over 2 Lakhs In Auction In Kashmir:

काश्मीरमधील सोपोरमधील मालपोरा गावातून एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका गरीब माणसाने स्थानिक मशिदीच्या बांधकामाला हातभार लागावा यासाठी एक अंडे दान केले. त्यानंतर या अंड्याच्या लिलावत त्याच्यावर तब्बल 2.26 लाख रुपयांचे बोली लागली. ज्यातून मशिदीच्या बांधकामासाठी लाखो रुपये उभा राहिले.

मशिदीच्या बांधकामासाठी निधी गोळा करायला गावकऱ्यांनी एकत्र येत फेरी काढली. या दरम्यान देणगी म्हणून एक अंडे मिळाले. या अंड्याच्या अनोख्या देणगीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मस्जिद समितीने देणगीदाराचा प्रामाणिकपणा ओळखून हे अंडे लिलावासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, एका वृद्ध महिलेने नाव न सांगण्याची विनंती करत सांगितले की, तिला तिच्या कोंबडीने दिलेले ताजे अंडे दान करायचे होते. यांनंतर हे अंडे लिलावात टाकण्यात आले. लिलावादरम्यान हे अंडे इतके आकर्षक ठरले की, पाच ते सात रुपये किंमत असलेल्या या अंड्याला लिलावात सर्वाधिक किंमत मिळाली.

एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, लोक तीन दिवस अंड्यावर बोली लावत राहिले आणि प्रत्येक फेरीनंतर, यशस्वी बोली लावणाऱ्याने त्याच्या बोलीची रक्कम भरत रकमेसह अंडे समितीकडे परत केले. जेणेकरून त्यावर अधिकाधिक लोक बोली लावू शकतील.

लिलावाच्या शेवटच्या दिवशी दानिश अहमद नावाच्या तरुण व्यावसायिकाने हे अंडे 70 हजार रुपयांना विकत घेतले. दरम्यान, लिलावात ही अंडी अनेकवेळा विकत घेण्यात आली. त्यानंतर एकूण किंमत 2 लाख 26 हजार 350 रुपये एवढी होती.

दानिशने सांगितले की, गावात एक मोठी मशीद बांधायची आहे. त्यासाठी मोठ्या रकमेची गरज होती. मी श्रीमंत नाही, पण मला मशीद बांधण्यासाठी काहीतरी करायचे होते. त्यामुळे मी 70 हजार रुपये देऊन हे अंडे खरेदी केले.

दानिश म्हणाला की, अंडे विकत घेतल्यानंतर माझ्या आईने मला मिठी मारली आणि म्हणाली की तू चांगले केले आहेस. आमच्या गावात सुमारे 250 घरे आहेत. घर चालवण्यासाठी प्रत्येकजण सफरचंदाच्या बागेत कष्ट करतो, पण मशिदीसाठी गावातील प्रत्येक व्यक्ती योगदान देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT